
अमरावती : जुलै महिन्यात अतिवृष्टीने (Heavy Rain) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी (Financial Assistance To Farmer) जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने राज्य आपत्ती व्यवस्थापनातील (Disaster Management) जुन्याच तरतुदीने मदत निधीची (Fund) मागणी केली आहे. राज्य सरकारने वाढीव मदत जाहीर केली असली तरी मदत मात्र जुन्याच तरतुदीने मिळणार असल्याचे यामुळे स्पष्ट होऊ लागले आहे. दरम्यान, प्रशासनाने अतिवृष्टीने बाधित क्षेत्रफळासाठी २०४ कोटी ४२ लाख, तर खरडून गेल्याने व गाळ साचल्याने खराब झालेल्या जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी ९ कोटी ४ लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.
जुलै महिन्यात ५, १०, १८, १९, २४ व २४, असे सहा दिवस ५४ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. अमरावती, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनागवसुर्जी, चांदूरबाजार, धारणी व चिखलदरा या तालुक्यांना फटका बसला. त्यामुळे शेती व फळपिकांचे नुकसान झाले. एकूण २ लाख ४१ हजार १६४ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. बाधित क्षेत्राच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने १३ मे २०१५ च्या शासन निर्णयामधील निकषानुसार २०४ कोटी ४२ लाख अनुदान मागणीचे प्रस्ताव पाठविले आहेत.
जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, नांदगावखंडेश्वर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगावसुर्जी, चांदूरबाजार, धारणी व चिखलदरा या अकरा तालुक्यांतील ८८१.५ हेक्टर जमीन खरडून गेली. या बाधित शेतकऱ्यांना ३ कोटी ५ लाख ६ हजार ५० रुपयांची, तर शेतात तीन इंच गाळ साचल्याने खराब झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईपोटी ५ कोटी ७४ लाख ३२ हजार ११० रुपयांची मागणी केली आहे. सरकारने तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
वाढीव मदत मिळण्याची शक्यता धूसर
राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापनातील मदतीच्या निकषांत बदल करून वाढीव मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासनाकडून कोरडवाहू शेतीच्या नुकसानीच्या मदतीसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांप्रमाणेच मागणी नोंदविण्यात आली आहे. तर बागायतीसाठी १३ हजार ५०० व फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जुलैमधील बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नव्या घोषणेनुसार वाढीव मदत मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे जाणकारांचे मत आहे.
३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्र व अनुदान
कोरडवाहू : २०४७८८.५२ : १३९,२५,६१,९३६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.