नुकसानग्रस्तांना तातडीने भरीव मदत द्यावी

येवला तालुक्यातील काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : येवला तालुक्यातील काही भागात ढगफुटीसदृश पाऊस (Excessive Rain) झाल्याने सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) रस्ते उद्‍ध्वस्त झाले असून, शाळेच्या इमारती तसेच घरांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने तातडीने भरीव अशी मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

Crop Damage
Crop Damage : पिकातील अतिरीक्त पाणी बाहेर कसे काढाल?

भुजबळ यांनी शुक्रवार (ता.१३) येवला तालुक्यातील मुखेड, शिरसगाव व पाटोदा परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, कृषी अधिकारी श्री. देशपांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संजय बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरनारे, ज्येष्ठ नेते विश्‍वस आहेर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, गणपत कांदळकर, डॉ. प्रवीण बुल्हे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे १.१५ लाख हेक्टरवर नुकसान

भुजबळ म्हणाले, की राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याबाबत चर्चा केली असून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या होत्या. तसेच पावसाळी अधिवेशनात देखील नुकसानग्रस्तांना अधिक मदत तातडीने मिळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे १२ गावांमधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही शेतात प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे.

तातडीने विजेचा प्रश्‍न मार्गी लावण्यात यावा.

येवला तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरात १२ गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक भागात विजेचे प्रश्‍न निर्माण झाल्याने तातडीने हा प्रश्‍न सोडवून विजेचा प्रश्‍न मार्गी लावण्यात यावा. सिंगल फेज यंत्रणा व्यवस्थितरीत्या राबविण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com