
Water Pollution News सोलापूर : सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांतील २३ गावे-वाड्यांची अर्थवाहिनी असलेला कासाळगंगा प्रकल्प (Kasalganga Project) प्रदूषणमुक्त अन् बारमाही वाहण्यासाठी अभ्यास पूर्ण झाला.
कासाळगंगा प्रकल्प अविरल-निर्मल- स्वतंत्र वाहत राहावा, यासाठी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थ, तरुण, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी अभ्यास केला.
रयत शिक्षण संस्थेचे पंढरपूर येथील कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील महाविद्यालय, भूगर्भ अभ्यासक डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, पर्यावरण अभ्यासक डॉ. अजित गोखले, सामाजिक तज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे, डॉ. सोमीनाथ घोळवे आदींनी या सर्वांना अभ्यास विषयक मार्गदर्शन केले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात भीमा, माणगंगा, कासाळगंगा, आदिला, धुबधुबी, कोरडा या नद्यांचा समावेश आहे.
या उपक्रमात नदी संवाद यात्रा सर्वत्र झाल्या आहेत. नदी संवाद यात्रा जोडीला कासाळगंगा प्रकल्पात समाविष्ट असलेल्या कटफळ, चिकमहूद, महूद, महिम, खिलारवाडी, गायगव्हाण, गारडी, लोणारवाडी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगाव, वाडीकुरोली, शेळवे, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव या गावांमध्ये शिवारफेरी झाली. त्यात सरपंच, उपसरपंच, शेतकरी, ज्येष्ठ ग्रामस्थ, ग्रामसेवक, तलाठी, वन कर्मचारी संबंधित अधिकारी सहभागी झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.