
लातूर : लातूर कृषी विभागातील (Department of Agriculture) पाच जिल्ह्यांत यंदा १० नोव्हेंबर अखेरपर्यंत अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत २२ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या (Rabi Sowing) झाल्या आहेत. एकीकडे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे पीक (Kharif Crop Damage) मोठ्या प्रमाणावर हातचे गेले.
त्यामुळे शेतकऱ्यांची सारी मदार आता रब्बीवरच अवलंबून आहे. दुसरीकडे अनेक जमिनीमध्ये वाफसाच उशिरा मिळाल्याने ती जमीन रब्बीसाठी तयार करण्यास वेळ लागत असल्याने रब्बीची पेरणीही संथ गतीनेच सुरू असल्याची स्थिती आहे.
यंदा लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख ९४ हजार ३२० हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. त्यातही नांदेड जिल्हा आघाडीवर असून, त्यापाठोपाठ हिंगोली, उस्मानाबाद, लातूर व परभणी असा क्रम लागतो आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४६ टक्के तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी ८ टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे.
पीकनिहाय स्थिती
रब्बी ज्वारी ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७१८५७ हेक्टर असून, आतापर्यंत ४८८२३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १३.१३ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.
गहू ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १५६५१९ हेक्टर असून, आतापर्यंत ९६७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ६.१८ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.
हरभरा ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७८६१२४ हेक्टर असून, आतापर्यंत २२३६६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी २८.४५ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.
रब्बी मका ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७ हेक्टर असून, आतापर्यंत २१५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ११.९७ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.
करडई ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर असून, आतापर्यंत ५१४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी २६.३६ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.
जिल्हानिहाय रब्बी सर्वसाधारण क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
लातूर २८०४३७ ४६२१० १६
उस्मानाबाद ४१११७२ ६९८३३३ १७
नांदेड २२४६३४ १०३६५७ ४६
परभणी २७०७९५ २१८५३ ८
हिंगोली १७६८१३ ५२७६७ ३०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.