
Jawhar News : पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालय मुख्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता असल्याने तालुक्यातील कामे खोळंबली आहेत. येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात केवळ पाच कर्मचारी असल्याने तालुक्याचा विकास कसा होणार, असा सवाल जव्हारवासी करत आहेत.
येथील आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी १९९३ मध्ये जव्हारमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयाची स्थापना करण्यात आली.
त्यानुसार या कार्यालयाच्या अखत्यारित जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या आदिवासीबहुल तालुक्यातील पायाभूत सुविधा उपलब्ध होणे क्रमप्राप्त होते; परंतु सध्या कार्यालयात होत असलेली कामे ही जिल्हा पातळीवर ढकलली गेल्याने हा भाग अजून २० वर्षे मागे लोटला गेल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्याच्या निर्मितीचा फटका तालुक्याला
अतिदुर्गम अशा जव्हारात १९९२-९३ साली कुपोषणाने शेकडो आदिवासी बालके दगावली होती. याचे तीव्र पडसाद उमटल्याने तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जव्हारला भेट दिली व त्यांनी या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जव्हार भागात रस्त्याचे जाळे विणण्याचे आदेश दिले.
या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापासून सर्वच विभाग कार्यरत करण्यात आले. हे नियोजन काही काळ उत्तम प्रकारे यशस्वी झाले; परंतु १ ऑगस्ट २०१४ रोजी नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने सर्वच प्रशासकीय कार्यालय व महत्त्वाचे पदनाम असणारे अधिकारी जिल्हा पातळीवर रुजू झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.