
Maratha protests turn violent : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात जखमी आंदोलकांवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून आधार दिला.
शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, संदीप क्षीरसागगर उपस्थित होते.
मराठा आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांडे-पाटील उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात शेकडो आंदोलक जखमी झाले.
या हिंसक घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. आज बीड, जालना बंदची हाक देण्यात आली. तसेच माजी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर दुपारी खासदार शरद पवार यांनी जखमी आंदोलकांची अंबड उपजिल्हा रुग्णालयात भेट घेतली.
यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली. यावेळी जखमी आंदोलकांने शुक्रवारी आपबीती सांगितली. साहेब, आम्ही माळकरी माणसं आहोत. आमच्यावरी लाठीचार्ज केला, अशी तक्रार एका जखमी आंदोलकाने शरद पवार यांच्याकडे केली. या आंदोलकाच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आलीय. या जखमी महिलेचीही शरद पवार यांनी विचारपूस केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.