
तरडगाव, जि. सातारा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Krushi Vidypeeth) मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगावच्या ऊस बियाणे विक्रीचा नुकताच प्रारंभ झाला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (Someshwar Co-operavtive Sugar Mill) अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप (Purushottam Jagtap) यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील प्रगतशील शेतकरी राहुल भोकरे यांना ऊस बेणे मळ्याची पहिली मोळी देऊन बियाणे विक्री वाटपास सुरुवात झाली.
संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर म्हणाले, ‘‘पाडेगाव संशोधन केंद्र २५ हेक्टर क्षेत्रावर उसाच्या बियाणे मळे तयार केले आहेत. प्रामुख्याने को -८६०३२, फुले २६५, फुले १०००१, फुले ०९०५७, को ११०१५, फुले ११०८२ या वाणांचे बियाणे उपलब्ध होणार आहे. या महिन्यात को ८६०३२, फुले २६५ या वाणांचे बियाणे मिळेल.
डिसेंबर महिन्यात उरलेल्या वाणांचे बियाणे उपलब्ध होणार आहे. पूर्वहंगामी आडसाली लागवडीबरोबर खोडव्यासाठीसुद्धा याची शिफारस केली आहे. यंदा लागवड १,२५० हेक्टरवर करता येईल. बेणे बदलामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होत असल्याने सर्व साखर कारखाने आणि शेतकरी यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बियाणे वापरावे,’’ असे आवाहन केले आहे.
‘‘सर्व कारखाने, प्रगतशील शेतकऱ्यांनी उसाचे बेणे ऊस संशोधन केंद्रातून नेऊन उत्तम दर्जाचे बेणे वापरावे,’’ असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी केले आहे. केंद्रातून बियाणे विक्री अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. दत्तात्रेय थोरवे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.