
नांदेड : इसापूर प्रकल्पाच्या (Isapur Irrigation Project) लाभक्षेत्राअंतर्गत मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी क्षेत्र ओलीताखाली येते मात्र पाणी वापर समितीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. प्रशासनाने तत्काळ सिंचनासाठी (Irrigation) पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे यांच्या मार्फत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे अजूनही रब्बी सिंचनासाठी कुठलेही नियोजन नाही. शेतकऱ्यांना रब्बी पिकातून संजीवनी मिळेल या आशेने शेतीची मशागत करून रब्बी पेरणीसाठी सज्ज झाला. परंतु, योग्य वेळी सिंचनासाठी पाणी न मिळाल्यास रब्बी हंगामाही हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पन्नास हजार हेक्टर शेतीचे सिंचन इसापूर प्रकल्पावर अवलंबून आहे हा प्रकल्प यंदाही शंभर टक्के भरला आहे. यामुळे पाणी पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तहसीलदार सुजित नरहरे, शहराध्यक्ष महंमद बुराण, सरचिटणीस सुरज कोदली, युवकचे तालुकाध्यक्ष हानमंत नटूरे, शेख मुखीद, राहूल चौदंते, पप्पू बळे, शेख अहेमद, ज्ञानेश्वर गायकवाड, साहेबराव कदम, अशोक चव्हाण, बालाजी गाढे, शुभम सोनटक्के, विनायक देशमुख, पंडित शिंदे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.