अधिस्वीकृती शुल्क कमी करा

‘महाऑरेंज’ची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
Orange
OrangeAgrowon

नागपूर : रोपवाटिकांमधून (Nursery) उत्तम प्रतीच्या रोपांचा पुरवठा (Seedling Supply) व्हावा, यासाठी पूरक तंत्रज्ञान (Technology) देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था (Citrus Crop Research Center) देशभरातील रोपवाटिकाधारकांशी करार करत आहे. त्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. ते कमी करावे, अशी मागणी महाऑरेंजने (Maha Orange) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली.

Orange
Orange Demand:पावसामुळं मोसंबीच्या मागणीत घट

विदर्भातील संत्रापट्ट्यात दुय्यम प्रतीच्या खुंटावर बांधल्या जाणाऱ्या रोगग्रस्त कलमांमुळे संत्रा बागा ऱ्हास होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यापैकी एक लाख हेक्टर हेक्टर अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या काटोल, नरखेड भागात २५००० हेक्टर, तर उर्वरित राज्यात २५००० हेक्टरवर संत्रा क्षेत्र आहे. परंतु हिमाचलमधून पुरवठा होणाऱ्या गलगल नामक खुंटावर कलमे बांधली जात आहेत. त्यामुळे तयार होणारी रोपे ही रोगट किंवा त्यावर फळधारणा होत नाही, अशा प्रकारची होतात. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Orange
Orange : संत्रा पिकावरील मिलीबगचे व्यवस्थापन

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था देशभरात रोपांचा पुरवठा करते. परंतु मागणी अधिक आणि त्या तुलनेत रोपे निर्मितीचे काम अत्यल्प असल्याने त्यांना मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर संस्थेने त्यांच्याकडील रोपे निर्मितीचे तंत्रज्ञान देशभरातील इतर रोपवाटिकाधारकांना द्यावे. त्याकरिता त्यांच्याशी करार करावा, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानुसार संस्थेने हे कार्य हाती घेतले. परंतु त्यासाठी तब्बल दहा लाख रुपये करार शुल्कापोटी आकारले जात आहेत. सामान्य रोपपवाटिकाधारकांना इतकी रक्कम अदा करणे शक्य होत नाही. त्यामुळे ही रक्कम कमी करून रोपवाटिकाधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाऑरेंजने श्री. गडकरी यांच्याकडे केली. महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ, प्रशांत कुकडे, रवी बोरटकर यांनी वनामती येथे त्यांची भेट घेत हा मुद्दा मांडला.

शुल्क एक लाख करण्याचे निर्देश

रोपवाटिकाधारकांना अधिकृस्विकृती देण्याकरता केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे सध्याचे करार शुल्क दहा लाख रुपये आहे. ते जास्त असल्याने एक लाखापर्यंत खाली आणण्यासाठी निर्देश दिले जातील, असे गडकरी यांनी ‘महाआॕरेंज’च्या शिष्टमंडळाला सांगितले. तसे पत्रही गडकरी यांनी ‘सीसीआरआय’ला दिले.

संत्रापट्ट्यात रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यात रोगग्रस्त कलमांचा पुरवठा हे मुख्य कारण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सीसीआरआय’ने त्यांच्याकडील तंत्रज्ञान रोपवाटिकाधारकांना द्यावे, अशी मागणी होती. परंतु शुल्क कमी करावे, अशी मागणी श्री. गडकरी यांच्याकडे केली. त्यांनी त्याची दखल घेत शुल्क कमी करण्यासंदर्भात पत्र संस्थेला दिले आहे.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com