Rajaram Sahkari Sakhar Karkhana : सभासद अपात्रतेवरून अमल महाडिकांचे प्रत्त्यूत्तर, सतेज पाटलांनी पोरकटपणा थांबवावा

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्यातील सत्ताधारी महाडिक गटावर बोगस सभासदांची नोंद केल्याचा आरोप केला होता.
Rajaram Sahkari Sakhar Karkhana
Rajaram Sahkari Sakhar Karkhanaagrowon

Rajaram Sahkari Sakhar Karkhana : मागच्या ५ महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्यातील सत्ताधारी महाडिक गटावर बोगस सभासदांची नोंद केल्याचा आरोप केला होता.

यावर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश देत १२७२ सभासदांना अपात्र ठरवल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. याला राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

अमल महाडिक यांनी सादर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही.

सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना न्याय देऊन फेर तपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्या विषयी काय तक्रार आहे व त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडली आहेत आणि स्क्रुटिनी रिपोर्ट उपलब्ध करून देणे विषयी निर्देश दिले होते. तथापी यापैकी कोणतीही कागदपत्रे त्या सभासदांना उपलब्ध करून देणेत आलेली नाहीत.

तसेच रितसर कागदपत्रे हजर करणेस पुरेसा वेळ दिलेला नाही. त्यांचे रितसर म्हणणे आणि कागदपत्रांची कायदेशिर योग्य छाननी प्रादेशिक सहसंचालकानी केलेली नाही. प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे कोणतेही पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सदरचा बेकायदेशीर आदेश दिलेला आहे.

या निकालामध्ये मोठीमोठी आकडेवारी सांगून सभासदामध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव विरोधक करत असून खूप मोठ्या संख्येने १८९९ सभासदांचा प्रश्न असल्याचे ते भासवत आहेत. प्रत्यक्षात यापैकी ५५८ सभासद पात्र ठरले आहेत आणि ३३९ भादोले येथील सभासद मतदानास यापूर्वीच कारखान्याने वगळले होते. उर्वरित पैकी १०७ सभासद मयत आहेत. २ सभासद शेअर्स रद्द व अन्य नावे वर्ग झालेले आहेत. संख्या विचारात घेता हा विषय ८२४ सभासदापुरताच संबंधित येतो.

हे ८२४ सभासद मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने निवडणूकीच्या वेळी पात्रच होते. तरी देखील नुकत्याच झालेल्या निवडणूकीचा निकाल पाहता मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झालेले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. त्यामुळे या सभासदांच्या जीवावर सत्ता मिळविली हे सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे ठरते. खरे पाहता २१-० झालेला दारूण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही, हेच सुर्यप्रकाशा इतके खरे सत्य आहे असे अमल महाडिक म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com