
Nagar News : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना धक्का बसला आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत विखे यांच्या पॅनेलला केवळ एका जागेवर तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या पॅनेलने १८ जागांवर विजय मिळविला आहे.
नगर जिल्ह्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका तालुक्यातील नेता दुसऱ्या तालुक्यात हस्तक्षेप करत नाही. मात्र यावेळी गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूलमंत्री विखे पाटील व खासदार डॉ. विखे पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात माजी महसूलमंत्री थोरात व जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पॅनेल उभे करत चांगलेच आव्हान दिले होते.
आरोप- प्रत्यारोप झाले. शनिवारी मतदानानंतर सोमवारी (ता. १९) मतमोजणी झाली. यात महसूलमंत्री विखे पाटील व खासदार डॉ. विखे पाटील यांना धक्का बसला आहे. मतमोजणीत १९ पैकी १८ जागांवर थोरात-कोल्हे पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विखे यांना धक्का बसल्याचे कळताच पारनेरचे आमदार नीलेश लंकेही राहत्यात पोहोचले होते.
या निवडणूकीत शिर्डी गटामधून बाबासाहेब, विजय दंडवते, राहता गटातून माजी अध्यक्ष ॲड. नारायणराव ज्ञानेश्वर कारले, गंगाधर पांडुरंग डांगे व संपत कचरू हिंगे, अस्तगाव गटातून महेंद्र गोरडे, बाळासाहेब चोळके, नळे नानासाहेब, वाकडी गटातून अरूंधती फोपसे, सुधीर लहारे, शेळके विष्णुपंत शंकर, पुणतांबा गटातून गाढवे अनिल सोपान,
चौधरी संपत नाथाजी इतर मागासवर्गीय मतदार संघातून टिळेकर अनिल राजाराम अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अलेश कापसे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून- सातव मधुकर यशवंतराव, महिला प्रतिनिधी मतदार संघातून शोभाताई, कमलबाई गोंदकर धनवटे हे ७०० मतांच्या आसपासच्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. तर सहकारी संस्थांमधून विखे गटाला एक जागा मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.