
परभणी : ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक गावांच्या कृषी (Agriculture) विषयक गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्या दृष्टीने यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) गावांचे सर्वसमावेशक ग्राम कृषी विकास आराखडे तयार करावेत. त्यादृष्टीने सर्वांनी जबाबदारीने विहित वेळेत काम पूर्ण करावे’’, असे निर्देश लातूर कृषी विभागाचे सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी बुधवारी (ता.६) दिले.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहा आयोजित खरीप हंगाम (Kharif Season) पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्हि. डी. लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी बालासाहेब कदम, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, तंत्र अधिकारी आर. बी. हरणे, महादेव असलकर, पी. व्ही. भोर, बी. व्ही. वीर, जिल्हा मृद चाचणी अधिकारी पी. पी. घुले आदीसह तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिवेकर म्हणाले, खरीप हंगामाचे (Kharif Season)नियोजन जिल्हा तसेच राज्य स्तरावर केले जाते. त्यामध्ये गावांच्या गरजांचा आवश्यक त्या प्रमाणात समावेश होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी (Farmer) यांचा समावेश असलेली ग्राम कृषी विकास समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत शेती विषयक सर्व बाबींवर चर्चा होईल.’’
‘‘गावातील जमीन, पर्जन्यमान, सिंचन सुविधा, उपलब्ध साधनसामुग्री दळणवळण, माती परिक्षणावर आधारित जमीन प्रकार आदी बाबींचा विचार करून येत्या खरीप हंगामासाठी ग्राम कृषी विकास आराखडे अंतिम करावेत. सोयाबीन बियाणे (Soybean Seeds) उगवणशक्ती चाचणी, माती परिक्षण, रासायनिक खतांचा कमी वापर आदीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी,’’ असेही दिवेकर म्हणाले.
गुरुवारी (ता.२१ एप्रिल ) परभणी येथे कृषिमंत्री दादा भुसे (DaDa Bhuse)+ यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर कृषी विभागातील जिल्ह्यांची खरीप हंगाम तयारी आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत निवडक कृषी सहाय्यकांना ग्राम कृषी विकास आराखड्यांचे सादरीकरण करावे लागेल. त्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. जिल्ह्यातील मंडळ कृषी अधिकारी, (Agriculture Officer) कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.