Gram Panchayat Election : मुरूडमध्ये प्रचाराच्या भाषणानंतर पॅनेलप्रमुखाचा व्यासपीठावरच मृत्यू

राज्यातील सर्वात मोठ्या मुरूड (ता. लातूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिरंगी लढतीतील प्रचाराला वेग आला असतानाच बुधवारी (ता. १४) रात्री भाजपप्रणित विरोधी पॅनेलचे प्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमरबापू पुंडलिकराव नाडे (वय ४३) यांचा प्रचार सभेत व्यासपीठावरच मृत्यू झाला.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

लातूर : राज्यातील सर्वात मोठ्या मुरूड (ता. लातूर) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) तिरंगी लढतीतील प्रचाराला वेग आला असतानाच बुधवारी (ता. १४) रात्री भाजपप्रणित विरोधी पॅनेलचे प्रमुख व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमरबापू पुंडलिकराव नाडे (वय ४३) यांचा प्रचार सभेत व्यासपीठावरच मृत्यू झाला.

Election
Grampanchyat Election : ग्रामपंचायतींचे काउंटडाउन सुरू

त्यांच्या पत्नी अमृता या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार असून पॅनेलच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री सार्वजनिक स्टेजवर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. पॅनेलप्रमुख म्हणून नाडे यांनी भाषण केले व ते व्यासपीठावरील पत्नी अमृता यांच्या शेजारील खुर्चीत विराजमान झाले.

त्यानंतर थोड्या वेळातच नाडे यांनी मान टाकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेत धावपळ सुरू झाली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. नाडे यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. नाडे यांच्या मागे पत्नी अमृता, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com