Crop Insurance : दीड कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरले, कृषी मंत्र्यांनी दिली माहिती

Pik Vima : शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे दिली.
dhananjay munde
dhananjay mundeagrowon

Maharashtra News : राज्य सरकारकडून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत दीड कोटी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ही ३१ जुलैपर्यंतची होती. मात्र, यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना तीन ऑगस्टपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज भरता येणार असल्याचीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

पीक विमा भरण्यासाठी असणारी वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकरी हैराण झाले होते. दरम्यान शेतातील कामे सोडून शेतकऱ्यांना दिवसभर सीएससी केंद्रावर बसून रहायला लागायचं. दरम्यान काल शेवटची तारीख असल्याने अनेक शेतकऱ्यांना हा चिंतेचा विषय बनला होता.

दरम्यान यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून ३ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

dhananjay munde
Crop Insurance : पीकविमा अर्ज भरण्यास गुरुवारपर्यंत मुदतवाढ

या जिल्ह्यांनी भरले अर्ज

पीक विम्याचे अर्ज सर्वाधिक पुणे जिल्ह्यात भरण्यात आले आहेत यामध्ये पुणे - १६,३६,३८०, नाशिक - ११,१३,३५८, कोल्हापूर - ४,७६१८७, कोकण - १,७३,९५४, छत्रपती संभाजीनगर - ३८,३०७८९, लातूर - ३९,५९,३७०, अमरावती - २७६-१९३, नागपूर - १०,९७,५६७ या विभागांचा समावेश आहे. मागच्या वर्षी ९६,६३,२६१ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा कवच देण्यात आला होता. तर यंदा ९९,१७,२२४ हेक्टर क्षेत्रावर पीक विमा कवच देण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com