Jowar Sowing : नांदेडला ज्वारीच्या पेऱ्यात यंदा मोठी घट

Kharif Jowar Sowing : नांदेड जिल्ह्यात खरीप ज्वारीचा पेरा सरासरी पेरणी क्षेत्राच्या ७६ टक्क्यांनी घटला आहे.
Jowar
JowarAgrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात खरीप ज्वारीचा पेरा सरासरी पेरणी क्षेत्राच्या ७६ टक्क्यांनी घटला आहे. परिणामी तृणधान्याचा पेरा वाढविण्यात अपयश आल्याचे सिद्ध होत आहे. यासोबतच कडधान्यांमध्ये उडीद व मुगाचा पेराही निम्यावर आला आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मधील पेरणीचा अंतिम अहवाल नुकताच शासनाला सादर झाला आहे.

Jowar
Jowar Market : सासवडमध्ये ज्वारीला उच्चांकी ६३११ रुपये दर

यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या १००.०८ टक्क्यांनुसार सात लाख ६७ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे.

यात तीन लाख ५३ हजार ३१४ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असलेले सोयाबीन सर्वाधीक चार लाख ५१ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कळविले आहे. दोन लाख ४१ हजार हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असताना दोन लाख पाच हजार ३५० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

Jowar
Jowar Sowing : खरीप ज्वारीच्या क्षेत्रात १ हजार ४७१ हेक्टरने घट

तर ६७,४२३ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असलेल्या तुरीची पेरणी ६६ हजार ६५० हेक्टरवर झाल्याचे कळविले आहे. २७ हजार ३९२ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असलेल्या मुगाची पेरणी १५ हजार २१४ हेक्टरवर झाली आहे.

तर २९ हजार ६२५ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असलेल्या उडदाची १४ हजार ५३४ हेक्टरवर पेरणी झाल्याचा अहवाल शासनाला कळविला आहे.

परंतु यात खरिपात ज्वारीच्या पेऱ्यात मात्र धक्कादायक घट झाल्याचे कळविले आहे. नांदेडमध्ये ४४ हजार हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र असताना यंदा केवळ २४ टक्क्यांनुसार ११ हजार हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

चाऱ्यासह धान्याचा प्रश्‍न उद्भवणार

नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पेऱ्यात धक्कादायक घट झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह गव्हानंतर सर्वाधीक खाद्य म्हणून उपयोगात येणाऱ्या ज्वारीचा प्रश्‍न उद्भवण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीमध्ये चारा पिकांकडे वळविण्यात प्रशासनाला किती यश येईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

ज्वारी कापण्यासाठी दरवर्षी माणसे मिळत नाहीत. ज्वारीला बाजारभाव मिळत नाही. यासोबतच रानडुकरामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे आम्ही ज्वारी पेरणे सोडून दिले आहे.
- रत्नाकर ढगे, प्रगतिशील शेतकरी, सायाळ, ता. लोहा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com