Lumpy Virus : नांदेड जिल्हा ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित

Lumpy Skin Disease : नांदेड जिल्ह्यातील लम्पी आजारांमुळे बाधित गावांची संख्या 197 असून, बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 643 एवढी आहे. त्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.
Lumpy Disease
Lumpy DiseaseAgrowon

Nanded Lumpy News : प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लम्पी स्किन आजाराच्या बाबतीत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

Lumpy Disease
Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यात ४२९ पशुधनाला ‘लम्पी स्कीन’ची बाधा

नांदेड जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घोषित केला आहे. लम्पी स्किन नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे यांची ज्या ठिकाणी ते पाळले ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Lumpy Disease
Lumpy Virus : ‘लम्पी स्कीन’ रोखण्यासाठी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ मोहीम

गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांना निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांना शव, कातडी, किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या, मोकाट पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी व जनावरांचे गोठे व त्या लगतच्या परिसरात कीटकनाशक फवारणी मोहीम स्वरूपात राबविण्यात यावी. बाधित क्षेत्रातील बाधित पशुधनावर उपचार करणे त्याप्रमाणे गोवर्गीय पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम स्वरूपात हाती घेऊन उर्वरित गोवर्गीय पशुधनाचे लसीकरण तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत, असेही आदेशात जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

बाधित पशुधन राज्यात येण्यास बंदी

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित पशुधनाची वाहतूक केल्यामुळे बाधित पशुधनापासून निरोगी पशुधनास या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा, राज्य सीमेवरील तपासणी नाका येथे पशूंची तपासणी करण्याच्या तसेच बाधित पशुधन राज्यात, जिल्ह्यात येणार नाहीत याबाबत तपासणी नाका प्रमुखांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com