
कोल्हापूर : दिंडेवाडी-बारवे दरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पामुळे (Naganwadi Project) या खोऱ्यात हरितक्रांती होईल. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच हा प्रकल्प साकारला आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ(Hussan Mushrif) यांनी केले. या प्रकल्पामुळे साडेतीन हजारांहून अधिक एकर शेती ओलिताखाली येईल, असेही ते म्हणाले.
भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी-बारवेदरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पाचे पाणीपूजन आमदार मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार संजयबाबा घाटगे, बजरंगअण्णा देसाई, के. पी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव देवणे आदींसह शेतकऱ्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मुश्रीफ बोलत होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, की २२ वर्षांपूर्वी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर माझ्या काळात तांत्रिक मान्यता व निधी उपलब्ध केला. त्या वेळी माजी आमदार बजरंगअण्णा देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. पुनर्वसनातील तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पाला गती मिळाली. माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने
३१ जानेवारी २००० रोजी या प्रकल्पासाठी १२ कोटी व १९ सप्टेंबर २०२१ रोजी ७३ कोटी निधी मंजूर झाला.
माजी सदस्य शशिकांत खोत यांनी स्वागत केले.
पिंपळगावचे सरपंच व भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले. नागनवाडीचे सरपंच अशोक साळोखे यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.