Farm Implements Production : ‘वनामकृवि’चा कृषी अवजारे निर्मितीसाठी सामंजस्य करार

Agriculture Implements Manufacturing : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या वतीने लहान व मध्यम भूधारक शेतकऱ्यांकरिता उपयुक्त अशी अनेक कृषी अवजारे विकसित करण्यात आली आहेत.
VNMKV Parbhani
VNMKV ParbhaniAgrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या वतीने लहान व मध्यम भूधारक शेतकऱ्यांकरिता उपयुक्त अशी अनेक कृषी अवजारे विकसित करण्यात आली आहेत.

या अवजारांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे. ही बाब विचारात घेऊन अवजारे निर्मितीसाठी परभणी कृषी विद्यापीठाने आणि नाशिक येथील मे. इनव्हेंटिव्ह सोल्यूशन नाशिक यांच्‍यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

VNMKV Parbhani
VNMKV Implements : परभणी विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारे उत्‍तर प्रदेशातही लोकप्रीय

त्यानुसार कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या २३ कृषी अवजारे निर्मितीचे अधिकार मे. इनव्हेंटिव्ह सोल्यूशन नाशिक यांना देण्यात आले आहेत. सामंजस्य कराराचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

VNMKV Parbhani
VNMKV Research : ‘वनामकृवि’स संशोधनासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. व्ही. एम. भोसले, योजनेच्या प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, इंजि. अजय वाघमारे, कृषी उद्योजक मे. इनव्हेंटिव्ह सोल्यूशन नाशिकचे प्रशांत पवार व पवन राजेंद्र खर्डे, प्राचार्य डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ. डिगांबर पेरके आदींची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. इंद्र मणी म्हणाले, की परभणी कृषी विद्यापीठाने मनुष्य, बैलचलित व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे संशोधित केलेली आहेत, ही अवजारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याकरिता या अवजारांची दर्जेदार निर्मिती करून किफायतशीर दरात उपलब्ध करण्याची गरज लक्षात घेता हा सामंजस्य करार महत्त्वाचा आहे. केवळ कृषी अवजारे संशोधित करुन उपयोगाचे नसून ते जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवून त्यांना शेतीमध्ये जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com