KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा

Insurance KDCC Bank : विमा हप्त्याची एक कोटी, १९ लाखांची सर्वच रक्कम जिल्हा बँकेने भरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली.
KDCC Bank
KDCC Bankagrowon

KDCC Bank News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या १८ ते ८५ वर्षांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार सभासद शेतकऱ्यांचा अपघाती मृत्युपोटी दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरवला आहे.

विमा हप्त्याची एक कोटी, १९ लाखांची सर्वच रक्कम जिल्हा बँकेने भरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणतीही तोशीस लागणार नाही.

लवकरच निविदा मागवून जिल्हा बँकेकडे पगाराची खाती असलेल्या नोकरदारांसाठी ३० लाख रुपयांच्या सामूहिक अपघाती विमा सुरक्षेची योजना आणण्याचा निर्णयही बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झाला. शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेत समाविष्ट अपघातांच्या प्रकारांमध्ये रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत अपघातात मरण पावणाऱ्या सभासदांच्या वारसाला दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार ८८० कर्जदार सभासद शेतकऱ्यांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱ्याला या योजनेमधून मदत मिळणार आहे.

KDCC Bank
Online Satbara : आता एका क्लिकवर सातबारा होणार दुरूस्त, असा करा ऑनलाईन अर्ज

कर्त्या कुटुंब प्रमुखाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शेतकरी कुटुंब उघड्यावर पडू नये, या उद्देशाने संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. २२) झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ईफको टोकियो जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीला धनादेश दिला. मुदत एक वर्षापर्यंत आहे. 

या वेळी बँकेचे संचालक आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, प्रताप ऊर्फ भैय्या माने, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, सुधीर देसाई, रणजीतसिंह पाटील, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com