India Rice Export Ban : भारताच्या तांदूळ निर्यात बंदीचा जगावर परिणाम, आशिया खंडाला मोठा फटका

Basmati Rice : जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारताने २० जुलै रोजी बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली.
India Rice Export Ban
India Rice Export Banagrowon

India Rice Export Ban : देशांतर्गत अन्नधान्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचबरोबर देशांतर्गत अन्न धान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारताने २० जुलै रोजी बिगर बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे जागतिक तांदूळ बाजारावर परिणाम होऊन करोडो लोकांना फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

यामध्ये सर्वाधिक आशियाई आणि आफ्रिकन लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा ४०% पेक्षा जास्त वाटा आहे. भारताने बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी लादण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण यावेळेस त्याचा परिणाम पूर्वीपेक्षा अधिक दूरगामी असण्याची शक्यता आहे.

चिनी मंडी या वृत्तसंस्थेने केलेल्या विश्लेषनानुसार, मलेशियामध्ये तांदळाची सर्वाधिक टंचाई भासण्याची शक्यता आहे तर बार्कलेज देश भारतीय तांदळावर पूर्णत अवलंबून आहे. मलेशिया भारताकडून तांदूळ मोठ्या प्रमाणात आयात करतो. यानंतर सिंगापूरला भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जाते.

बार्कलेजकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूर मुख्यत्वे तांदूळच नव्हे तर सर्वसाधारणपणे अन्न धान्याच्या बऱ्याच गोष्टी आयात करत असतो. याचबरोबर भारताकडून थायलंड, पाकिस्तान आणि व्हिएतनाम सारख्या छोट्या देशांना तांदळाची निर्यात केली जाते.

दरम्यान यंदा अल निनोचा मोठ्या प्रमाणात भात शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे तांदळाच्या किंमी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे आफ्रिकन आणि मध्य पूर्व देशांसह, जिबूती, लायबेरिया, कतार, गांबिया आणि कुवेत या देशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

India Rice Export Ban
Black Rice : काळा तांदूळ फक्त स्वादिष्टच नाही तर...

यापूर्वी भारताने ऑक्टोबर २००७ मध्ये भारताने गैर-बासमती निर्यातीवर बंदी घातली, केवळ तात्पुरती बंदी उठवली आणि एप्रिल २००८ ती पुन्हा लादली. यावेळी ३० टक्के तांदळाच्या किंमती वाढल्या होत्या आता पुन्हा याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सीआयपीचे आशियाई प्रादेशिक संचालक समरेंदू मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ च्या दरम्यान नॉन-बासमती तांदळाच्या जागतिक निर्यातीमध्ये भारत हा प्रमुख खेळाडू नव्हता आणि सध्याच्या बंदीचे १६ वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

जर व्हिएतनाम आणि कंबोडिया सारख्या प्रमुख तांदूळ निर्यातदारांनी स्वतःच्या निर्यातीवर निर्बंध लादले आणि इंडोनेशिया आणि मलेशियासारखे महत्त्वाचे आयातदार साठेबाजीसाठी पुढे आले तर जागतिक तांदूळ बाजारात गोंधळ होऊ शकतो, असे मोहंती म्हणाले.

भारताने घातलेल्या तांदळाच्या निर्यात बंदीवर लोकांची संख्या लाखोंच्या घरात जाईल, असे मोहंती म्हणाले. ही निर्यात बंदी उठवण्याची शक्यता कमी आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत ही बंदी कायम राहील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com