Wheat Prices : रशियामुळे गव्हाचे भाव कमी होतील का? गहू काढणी निम्म्यावर; भाव कमी होतील का?

International Market : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाची मागणी लक्षात घेता दर जास्त कमी होतील असे वाटत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.
Wheat
WheatAgrowon

Pune News : रशिया जगातील आघाडीचा गहू निर्यातदार आहे. आता रशियातील गूह काढणी जोमात सुरु आहे. रशियातील जवळपास ५० टक्के गहू काढणी पूर्ण झाली असून हिवाळी पेरण्याही सुरु झाल्या. रशियाचा गहू बाजारात आल्यानंतर दरावर दबाव येत असतो. त्यामुळे रशियाचा गहू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं वजन राखून आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे भाव वाढले आहेत. त्यातच भारताने निर्यातबंदी केली. यामुळे गहू दरवाढीला आधारच मिळाला. जागतिक बाजारात रशियातून मोठ्या प्रमाणात गहू येत असतो. रशिया गहू निर्यातीत आघाडीवर असतो.

भारताने निर्यातबंदी केल्यानंतर रशियाच्या गव्हाला विशेष महत्व प्राप्त झाले. त्यातच रशियाची गहू काढणी आता सुरु आहे. तर गहू काढणी केलेल्या क्षेत्रात हिवाळी पेरण्याही जोमात सुरु आहेत, असे रशियाच्या कृषी मंत्रालयाने सांगितले.

Wheat
Vasubaras Special : 'वसुबारसे'च्या निमित्ताने गाईचा केलेला खास फोटोशूट!

रशियातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५० टक्के गहू काढणी पूर्ण केली. रशियाच्या शेतकऱ्यांनी यंदा जवळपास १४८ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी केली होती. त्यापैकी ६५ लाख हेक्टरवरील गव्हाची काढणी पूर्ण झाली. पण यंदा गव्हाची उत्पादकता घटली आहे.

तसेच गहू काढणीला  उशीर होतो तसे उत्पादकता कमी होत आहे. तसेच बार्लीची काढणीही निम्म्यावर पोचली. ४५ टक्के बार्लीची शेत रिकामी झाली. बिन्सची काढणीही ३६ लाख हेक्टरपर्यंत पोचली. 

पिकांची काढणी सुरु झाल्यानंतर हिवाळी पेरण्याही वेग घेत आहेत. रशियातील शेतकरी हिवाळी हंगामातील पिकांच्या बियाणे आणि खते खरेदीत व्यस्त दिसतात. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७० हजार हेक्टरवर परण्या गेल्या. यापैकी २७ हजार हेक्टरवर मोहरीचे पीक आहे. तर गव्हाचे पीक ५ हजार हेक्टरवर दिसते.


जागतिक बाजारात दर कमी होतील का?


भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात दरात मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील हंगामात भारताची निर्यात चांगली झाली होती. पण यंदा भारत गहू निर्यात करणार नाही.

रशिया निर्यातीत आघाडीवर असला तरी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाची मागणी लक्षात घेता दर जास्त कमी होतील असे वाटत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com