Rain Update : मराठवाड्यात पावसाची तुफान खेळी

राज्यातील बहुतांश भागांत पावसाच्या सरी पडत आहेत. मराठवाड्यात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाने दाणदाण केली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यातील बहुतांश भागांत पावसाच्या सरी (Rainfall) पडत आहेत. मराठवाड्यात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाने दाणदाण (Heavy Rain In Marathwada) केली. तर कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा जोर (Rain Force) अधिक आहे. आज आणि उद्या सकाळपर्यंत या भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) व्यक्त केली. तर राज्यातील इतर भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक विस्कळीत झाली. कुडाळ तालुक्यातील २७ आणि बांदा परिसरातील काही गावांचा शहरांशी सपंर्क तुटला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतही पावसाचा जोर कायम होता. समुद्राला उधाण आलं असून वाऱ्याचा वेग वाढला. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. फळबागा, भातशेतीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने नुकसान झाले.

Rain Update
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

पुणे जिल्ह्यातही शनिवारी सकाळपासून पावासाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्वंच तालुक्यांत पाऊस पडला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही पावसाचा जोर वाढला होता. शुक्रवारी रात्रीपासून महाबळेश्‍वर, पाटण, जावळी, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी पावसाच्या दमदार सरी येत आहेत. सांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू आहे.

मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावासाने दाणदाण केली. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ८२ मंडळांमध्ये शनिवारी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १० आणि परभणी जिल्ह्यातील १५ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडलामध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा आदी गावांमध्ये आसना नदीच्या पुराचे पाणी शिरले. घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली. जमिनी खरडून गेल्याने हळद, ऊस, केळी, सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद, ज्वारी आदी पीकांचे नुकसान झाले. पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सुरु झालेला पाऊस शनिवारीही सुरु होता. सात तालुक्यांसह तब्बल ३२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हा पाऊस नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, भोकर, धर्माबाद, उमरी, बिलोली, हिमायतनगर, नायगाव या तालुक्यांत झाला. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तर हजारो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. पुल आणि रस्ते वाहून गेले.

औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा मंडळात ११३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील बर्दापूर मंडळात ६८.३ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भात मात्र पावासाचा जोर कमी होता. काही भागांत जोरदार पाऊस झाला. एक-दोन मंडळांचा अपवाद वगळता वऱ्हाडातही हलका पाऊस पडला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com