Shambhuraj Desai : राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार ; शंभूराज देसाई

Illegal hand-kiln liquor : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiAgrowon

Solapur News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यांपासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून, या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी (ता. २८) येथे दिली.

पुणे विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत श्री. देसाई मार्गदर्शन करत होते. या वेळी उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उपायुक्त मोहन वर्दे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणजीत राजपूत (पुणे), प्रमोद सोनोने(नगर), नितीन धार्मिक (सोलापूर) यांच्यासह विभागातील उपअधीक्षक ही उपस्थित होते.

श्री. देसाई पुढे म्हणाले, पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व गावांमध्ये हातभट्टी निर्मिती नष्ट करण्यासाठी काटेकोरपणे कारवाई करावी. शासन लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान धोरण आणणार आहे.

पुणे विभागाच्या महसूलात १३ टक्के वाढ

पुणे विभागाच्या महसुलात मागील वर्षीपेक्षा यावर्षी १३ टक्के वाढ झालेली आहे, त्याप्रमाणेच गुन्हे अन्वेषणाचे प्रमाणात १५ टक्के वाढ झालेली आहे. तसेच हातभट्टी दारू विरुद्ध १ एप्रिल २०२३ ते २७ ऑगस्ट २०२३ पर्यंत २००४ गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९७५, अहमदनगर ४०७, सोलापूर ५११ व विभागीय भरारी पथक १११ अशी गुन्ह्यांची संख्या आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com