Gram Panchayat Election : ग्राम पंचायत निवडणुकीत नातेसबंधाना धक्का

एकीकडे जोरदार इर्षा, गटतट, विकास कामाचे दाखले देत सत्ता देण्याची करण्यात येणारी मागणी आणि या धूरळ्यात उडून चाललेली नाती हे चित्र आता ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गावोगावी दिसतोय.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : निवडणुका (Gram Panchayat Election) लागल्या तस सगळच बदललं.. रोजचा मैतर भेटनासा झाला.. अडचणीच्या च्या वेळी धावून येणारा नात्यातला भाऊ फोन टाळू लागला.. जशी माझ्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली.. तेव्हा ही मंडळी दुसरीकडेच दिसू लागली.. मन अस्वस्थ झालं.. नाती तुटणार असतील तर कशाला या भानगडीत पडलो असा विचार आला, पण आता इलाजच नव्हता.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : सांगलीतील ३८ गावांचे सरपंच बिनविरोध

ही मंडळी का दूर झाली हे विचारलं तर माझ्याविषयी प्रचंड गैरसमज करून देण्यात आले. त्यांचा माझा कधीच संबंध आला नाही त्यांनी ‘ही’ गैरसमजाची वात लावून दिली होती. आयुष्यभराची साथ तुटते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली.. निवडणूक होतेय पण माझी माणसं गमावल्याचं दुःख होतय. जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका प्रचंड राजकीय इर्षा असणाऱ्या गावातील एका उमेदवाराची ही अंतर्गत भावना...

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election : सरपंचपदासाठी ४६१ उमेदवार रिंगणात

एकीकडे जोरदार इर्षा, गटतट, विकास कामाचे दाखले देत सत्ता देण्याची करण्यात येणारी मागणी आणि या धूरळ्यात उडून चाललेली नाती हे चित्र आता ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गावोगावी दिसतोय.

गावागावातील लाखो रुपयांची होणारी उधळण मतदारांची उमेदवारा प्रति ‘कृत्रिम जिव्हाळा’ निर्माण करते. निवडणुकीच्या निमित्ताने कागल, राधानगरी करवीर, तालुक्यात फिरताना विकासासाठी चाललेल्या निवडणुका ह्याच का असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

आरक्षण पडले म्हणून ज्या गावात चांगला व्यवसाय आहे त्याला पकडून मारून मुटकून उमेदवारी देण्यासाठी गाव पुढार्‍यांची चाललेली धडपड. व्यवसायाच्या निमित्ताने आयुष्यभर सर्वांशी नाते जपणाऱ्या व्यवसायिकाला पडलेले कोडे, अशा वातावरणात ग्रामपंचायतीचा धुरळा गावोगावी सुरू आहे. डोक्यावर टोपी पांढराशुभ्र शर्ट पॅन्ट घालून मतदारांना अभिवादन करणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर पदयात्रा संपली की चिंतेचे ढग साचतात.

पैशाच्या मोहापाई कोणीतरी येऊन चार नकारात्मक गोष्टी सांगितल्या की उमेदवाराचा चेहरा पडतो. याला इलाज काय असे म्हटले की समोरचा पटकन पैशाची मागणी करतो आणि पैसे घेऊन गायब होतो.. हा सिलसिला अजून काही दिवस चालणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने डॉक्टर वकिली यासह अन्य चांगले व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती ही आरक्षण पडले आहे म्हणून गावच्या राजकारणात पडल्या आहेत. ‘दुरून डोंगर साजरे’ असणाऱ्या या राजकारणाने उमेदवारी स्वीकारल्याने हे काहीतरी वेगळेच प्रकरण असल्याचे लक्षात आले. त्यातून सुटका नाही असे सांगताना एका वकील उमेदवाराचा चेहरा कसानुसा झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com