Solar Pump : शेतकऱ्यांनी सौरपंपाचा लाभ घ्यावा

Agriculture Solar Pump : धुळे तालुक्यात सुमारे १०० शेतकऱ्यांना सौरपंपाचा लाभ मिळाला असून, सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
Solar Pump
Solar PumpAgrowon

Dhule News : धुळे तालुक्यात सुमारे १०० शेतकऱ्यांना सौरपंपाचा लाभ मिळाला असून, सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यामुळे शेतीला पाणी भरण्यासाठी विजेवर अवलंबून राहायची गरज नाही. सौरपंपसाठी ९० टक्के रक्कम शासन देते.

फक्त दहा टक्के रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही महत्त्वाकांक्षी योजना असून, शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

Solar Pump
Solar Agriculture Pump Scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

काळखेडे (ता. धुळे) येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ५५ लाख ५० हजार रुपये खर्चाचे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन तसेच

पंतप्रधान सौरकुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप वाटप खासदार भामरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Solar Pump
Solar Pump : सौरपंप दुरुस्तीसाठी पुरवठादार कंपनीकडून टाळाटाळ

सरपंच प्रवीण पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, विधानसभा संयोजक राम भदाणे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील, माजी उपसभापती विद्याधर पाटील, जिल्हा चिटणीस भाऊसाहेब देसले, उत्कर्ष पाटील,

माजी कृषी सभापती संग्राम पाटील, डॉ. दिनेश माळी, श्याम बडगुजर, शरद पाटील, राजेंद्र भामरे, शांताराम पाटील, महेश बागूल, मोहनसिंग परदेशी, दापुराचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक शिवाजीराव बोडके आदी उपस्थित होते. खासदार डॉ. भामरे म्हणाले की, मी मतदारसंघातील सिंचनाचे ९० टक्के प्रश्न सोडवले. ४० वर्षापासून प्रलंबित जामफळ प्रकल्प पूर्णत्वास येत, असल्याचे ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com