`ईडी’ हा राक्षसी कायदा : भुजबळ

‘‘भाजपच्या नेत्यांनी सांगितल्याशिवाय ईडीची धाड पडत नाही.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalAgrowon
Published on
Updated on

अकोला ः ‘‘सध्याचा ईडी हा राक्षसी कायदा असून तो रद्द झाला पाहिजे. यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत तो कायदा मागे घेण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे,’’ असे मत राज्याचे अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

अकोल्यात एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भुजबळ आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भुजबळ म्हणाले, ‘‘भाजपच्या नेत्यांनी सांगितल्याशिवाय ईडीची धाड पडत नाही. कुणी भाजपच्या विरोधात बोलला की ईडीची धाड पाडली जाते. भाजप सांगेल त्याप्रमाणे ईडी कारवाई करीत आहे.’’

Chhagan Bhujbal
सहकारी दूध संघच शाश्‍वत - बाळासाहेब थोरात

‘‘ईडीच्या कायद्यात जामीन मिळत नाही. हा राक्षसी कायदा असून, याविरुद्ध विरोधकांनीही एकत्र येण्याची गरज आहे. ईडीच्या कायद्याने बरेच जण अडचणीत येतात. सूडबुद्धीने याचा वापर केला जातो. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची गरज आहे’’, असे भुजबळ म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com