Kharif E Peek Pahani : परभणीत खरिपातील ३.१८ टक्के क्षेत्राची ई-पीक पाहणी

Kharif Season 2023 : ई-पीकपाहणी बाबत अजूनही शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागृती नाही. परिणामी, असंख्य शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे ई-पीकपाहणीचे प्रमाण कमी आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात बुधवार (ता. २) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५ लाख ४६ हजार ६५९ पैकी १५ हजार ४९३ शेतकरी (२.८३ टक्के) खातेदारांनी १९ हजार २४० हेक्टर क्षेत्रावरील (३.१८ टक्के) पिकांची ई पाहणी केली आहे. ई-पीकपाहणी बाबत अजूनही शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागृती नाही. परिणामी, असंख्य शेतकरी अनभिज्ञ असल्यामुळे ई-पीकपाहणीचे प्रमाण कमी आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतीखात्यांचे एकूण ६ लाख ७ हजार ७३४ हेक्टर आहे. एकूण ५ लाख ४६ हजार ६५९ शेतकरी खातेदार आहेत. यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे खरिपाची पेरणी लांबली. त्यामुळे ई-पीकपाहणी अॅपद्वारे पाहणीस उशीर झाला आहे. जिल्ह्यातील १५ हजार ४९३ शेतकरी खातेदारांनी १९ हजार २४० हेक्टर क्षेत्राची पाहणी केली आहे. त्यात एकूण ८३.५३ हेक्टर पड क्षेत्राचा समावेश आहे.

E Peek Pahani
E-Peek Pahani : ई-पीक नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

ई-पीकपाहणी झालेल्या खात्यांचे एकूण क्षेत्र १९ हजार ३२३ हेक्टर आहे. ई-पीकपाहणी झालेल्या खातेदारांची एकूण खातेदारांशी टक्केवारी २.८३ टक्के आहे. पीकपाहणी झालेल्या खात्यांचे एकूण खात्यांच्या क्षेत्राची टक्केवारी ३.१८ टक्के आहे. विविध पिकांच्या लागवडीखालील क्षेत्राची योग्य आकडेवारी (रियल टाइम डाटा) उपलब्ध व्हावा. त्यानुसार शासनास धोरणे ठरविता यावीत.

यासाठी ई-पीकपाहणी प्रकल्प राबविला जात आहे. परंतु महसूल, तसेच कृषी विभागांकडून व्यापक प्रसार व प्रसिद्धी केली जात नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी प्रक्रियेची माहिती नाही. अनेक भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभावामुळे ई-पीकपाहणी शक्य होत नाही.

E Peek Pahani
E-Peek Pahani : ई-पीक पाहणीत दीड कोटी शेतकरी सहभागाची शक्यता

त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीकपेऱ्यांची नोंद घेण्यासाठी अडचणी येत आहेत. एकूण पेरणी क्षेत्र व ई-पीकपाहणी क्षेत्र यांच्या मोठा फरक असल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीचे महत्त्व समाजावून सांगण्यासाठी महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाकडून प्रयत्नांची गरज आहे.

परभणी जिल्हा ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका एकूण शेतकरी खातेदार एकूण क्षेत्र पीकपाहणी खातेदार पीकपाहणी क्षेत्र क्षेत्र टक्केवारी

परभणी ९५९३८ १०९९६५ ३३२४ ४४१२ ४.०४

जिंतूर ९१३५८ ११९१५७ १५६९ २१३५ १.८०

सेलू ५९८७५ ६८६१२ ३१६५ ३८८३ ५.७२

मानवत ३९४५९ ४८१३६ १३७५ १८८७ ३.९३

पाथरी ४८५३ ५२९३७ ८०८ १०९५ २.०७

सोनपेठ ३२६८६ ३६९५४ ५२९ ७१० १.९२

गंगाखेड ७२०५९ ६३२३० १०१० १२६५ २.००

पालम ४८२४४ ४७९७६ २२६९ २२५४ ४.७१

पूर्णा ६२१८७ ६०७६३ १४४४ १५९५ २.६३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com