
Kharip Season : खरीप पीक नुकसानीचे भरपाई निश्चित करताना सातबारावर ई-पीक नोंदीचा सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्याची पळापळ होत आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असतानाच आता सर्वर डाऊन झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खरीप हंगामात वेळेवर पाऊस होईल या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून पेरणी केली. परंतु शासनाने यंदा पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शासनाने भरल्यामुळे शेतकऱ्यांनी लाखो हेक्टरवर बाजरी, तूर, मका, कांदा, भात, नाचणी, उडिद आधी पिकांचा विमा भरला याचबरोबर सूर्यफूल, भुईमूग ही पीके विम्यातून वगण्यात आली आहेत.
दरम्यान यंदा पाऊस नसल्याने माळरानासह काळ्या मातीतील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी ई पिक नोंद करणे गरजेचे आहे.
परंतु सर्वर डाउन असल्यामुळे ई-पिक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. ई पीक पाहणी नाही झाल्यास नुकसान भरपाई मिळणे कठीण असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. परंतु प्रशासनाकडून याबाबत ठोस मार्गदर्शन केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडले आहे.
राज्यात प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत परंतु खरीप पिक व पिक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी सातबारावर ई पिक व्दारे नोंदणी आवश्यक असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.
परंतु गेली दोन दिवसापासून सर्वर डाऊन असल्यामुळे पिकाची नोंदणी करता येऊ शकली नाही यासाठी मुदतवाढ देण्याची गरज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.