Dhairyasheel Mane : पंचगंगा नदी पाकिस्तानात आहे का? खासदार मानेंवर दूधगंगा बचाव कृतीसमितीचा पलटवार

Dudhganaga River : कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकूड येथून दूधगंगा नदीतून इचलकरंजीला थेट पाईपलाईन द्वारे पाणी देण्याचा विचार सुरू आहे.
Dhairyasheel Mane
Dhairyasheel Maneagrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीतून इचलकरंजीला थेट पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान यावरून कागल तालुक्यातील अनेक गावांसह आमदार खासदारांनी या योजनेला विरोध केला.

यावर हातकणंगले तालुक्यातील नेत्यांनी इचलकरंजीला पाणी मिळवून देण्यासाठी काल जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी इचलकरंजी पाकिस्तानातील आहे का? असा सवाल खासदार धैर्यशील माने यांनी केला होता.

यावर दूधगंगा बचाव कृती समितीने प्रतिप्रश्न विचारला आहे. ‘इचलकरंजीच्या नेत्यांनी पंचगंगेचे प्रदूषण थांबवायला हवे होते. पंचगंगा नदी पाकिस्तानात आहे का? असा प्रतिसवाल दूधगंगा बचाव कृती समितीचे नेते धनराज घाटगे यांनी हा सवाल केला आहे.

ते पुढे म्हणाले की, इचलकरंजीसह १३ गावांना पाणी दिल्यास लाभक्षेत्रातील शेतीला कमी पाणी मिळणार आहे. सध्या गळती व कालव्यांची कामे अपुरी आहेत. पूर्णपणे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. असे असताना पाणी विभाजन झाले तर प्रकल्पाचा मूळ हेतू बाजूला पडणार आहे. लाभक्षेत्रातील ज्यांच्या कालव्यासाठी व विस्थापितांसाठी जमिनी गेल्या त्यांच्यावर अन्याय होणार आहे.

Dhairyasheel Mane
Ichalkaranji Water Scheme : कोल्हापूरातील कागल तालुका आणि इचलकरंजी वाद पेटणार? पाणी योजनेस सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध

काळम्मावाडी लवादात इचलकरंजीला पाणी देण्याचा कुठेही उल्लेख नाही. पण इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी मिळू नये. ही आमची भूमिका नसून ही योजना वारणा किंवा कृष्णा नदीवरून केली तर अधिक सोयीचे होणार आहे.

इचलकरंजीकरांनी पंचगंगा शुद्ध ठेवण्याची उपाय योजना आखून सार्वत्रिक प्रयत्न करायला हवे होते असेही घाटगे यांच्यासह कृती समितीतील नेत्यांनी माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com