Sinnar Drought Conditions : सिन्नरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; शेतकरी चिंतेत

Water Shortage : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात देवपूर, फरदापूर, वडांगळी, मेंढी, धारणगाव, पंचाळे, धनगरवाडी आदी परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे
Drought conditions
Drought conditionsAgrowon

Nashik News : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात देवपूर, फरदापूर, वडांगळी, मेंढी, धारणगाव, पंचाळे, धनगरवाडी आदी परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले.

दुष्काळसदृश परिस्थिती पाहता शासनाने त्वरित जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, पंचायत समितीचे सदस्य विजय गडाख, गोवर्धन रानडे, ज्ञानेश्वर गडाख, सुखदेव गडाख, दिनेश गडाख, महाळू खोले यांच्यासह मेंढी, धारणगाव, वावी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

Drought conditions
Fodder Shortage : पशुधनाच्या चारा, पाण्याचा प्रश्‍न बिकट

ऑगस्ट महिन्याच्या मध्यातही पावसाचा या भागात पत्ताच नाही. त्यामुळे या भागात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचा धीर खचला असून, सर्वसामान्य जनताही हवालदिल झाली आहे. परिसरात पावसाने दडी मारल्याने सहा महिन्यांपासून शेतकरी आणि पशुपालक टंचाईग्रस्त परिस्थितीचा सामना करीत आहेत.

Drought conditions
POCRA Scheme: नाशिक जिल्ह्याचा पोकरा योजनेत समावेश करा: दीपिका चव्हाण

जनावरांचा चारा, पाणी व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. हा परिसर कायमच दुष्काळग्रस्त भाग असल्याने पशुधनाला चारा नाही, तसेच शाश्वत पाण्याची सोय नाही.

पशुपालक हवालदिल झाले असून, या भागात शेतीच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी सरपंच जयश्री गिते, उपसरपंच योगेश पाटील-गिते, सुरेश गिते, अनिल गिते, किशोर गिते, सागर गिते, सोमनाथ गिते, नितीन गिते, प्रवीण गिते व शेतकऱ्यांनी केली आहे.

पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्ण धोक्यात आला असून, परिसरातील विहिरी, ओढे, नाले, कूपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. दुष्काळाने त्रस्त झालेल्या या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

शिवारात फक्त सुकलेले पीक

मला कळतंय तसं मह्या आयुष्यातले दुष्काळाचे चार साल की पाहिले नाईत. गावात पावसाने दडी मारल्याने दोन महिन्याअगुदर पेरायपुरता पाऊस झाला. पुढं टीपकाबी पडला नाही. पेरलेले सारे जळून जातय का, असं झालंय. पिकांना बाहेरून टॅंकरने पाणी भरले. शिवारात फक्त सुकलेले पीक दिसू लागले आहे,’ अशी व्यथा सत्तरी ओलांडलेले काळू पाटील-साळवे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मांडली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com