
सोलापूर : शासकीय पोर्टलवरील (Government Portal) आणि सेवा सुविधा केंद्रावरील (Suvidha Kendra) नागरिकांच्या अर्जाचा निपटारा दिलेल्या मुदतीत होण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा सेवा पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा मोठ्या प्रमाणात झाला आहे,
उर्वरित प्रकरणांचा निपटारा पाच नोव्हेंबर २०२२ पर्यंत करण्याच्या, सूचना अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या. श्रीमती सौनिक यांनी सेवा पंधरवड्याचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.
या वेळी पुण्याहून विभागीय आयुक्त यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूरहून निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, तहसीलदार अंजली कुलकर्णी, दत्तात्रय मोहाळे उपस्थित होते.
श्रीमती सौनिक यांनी सेवा पंधरवड्याचा विभागनिहाय आढावा घेतला. २३ लाख ७६ हजार ६३२ अर्जापैकी १४ लाख ८६ हजार अर्जावर कार्यवाही झाली आहे. राज्यामध्ये शिधापत्रिका, किसान सन्मान निधी योजनांचे काम त्वरित होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सर्व विभागाच्या वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत, उर्वरित काम होण्यासाठी संबंधित यंत्रणांना कामाला लावले आहे. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत आलेल्या अर्जांचा निपटारा केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील काम ९८.७ टक्के झाले आहे. शिवाय इतर विभागाचेही काम ९८.८९ टक्के झाले आहे, असे सांगितले.
फक्त २३६१ अर्ज प्रलंबित..
आतापर्यंत एक लाख २२ हजार ८६९ अर्जापैकी एक लाख २० हजार ५०८ अर्जांचा निपटारा झाला आहे. केवळ २३६१ अर्ज शिल्लक आहेत. इतर जिल्हास्तरीय विभागांचे ३७ हजार २६६ अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी ३६ हजार ८५१ अर्जांचा निपटारा झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय २३६१ अर्ज आणि इतर विभाग ४१५ अर्जावर तांत्रिक अडचणी दूर झाल्या, तर येत्या १५ दिवसात पूर्ण अर्जांचा निपटारा होईल, असा विश्वास श्री. शंभरकर यांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.