Health News : मधुमेहावरील स्वस्त औषध उपलब्ध

केंद्रीय रासायनिक व खत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइस ब्युरो ऑफ इंडियाने (पीएमबीआय) सीटाग्लिप्टीन तसेच इतर मिश्रणाचे नवीन औषण जनऔषधी केंद्रात उपलब्ध करवून दिले.
Diabetes Medicine
Diabetes Medicine Agrowon

नवी दिल्ली : ‘सीटाग्लिप्टीन’ (Sitagliptin) नावाचे मधुमेहावरील स्वस्त औषध (Cheap Price Of Diabetes Medicine) केंद्रीय रसायन मंत्रालयाने (Union Ministry of Chemicals) बाजारात आणले आहे. या औषधाच्या १० गोळ्यांची किंमत ६० रुपये असेल. हे औषध देशातील सर्वच जेनरिक औषधांच्या दुकानात उपलब्ध असेल.

Diabetes Medicine
Cotton Crop : अतिपावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण

केंद्रीय रासायनिक व खत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइस ब्युरो ऑफ इंडियाने (पीएमबीआय) सीटाग्लिप्टीन तसेच इतर मिश्रणाचे नवीन औषण जनऔषधी केंद्रात उपलब्ध करवून दिले.

Diabetes Medicine
GM Soybean : देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनची मोठी खेप दाखल

सीटाग्लिप्टीन फॉस्फेट च्या ५० मिलिग्रॅमच्या (एमजी) १० गोळ्या ६० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर सीटाग्लिप्टीन आणि मेटफॉर्मिन हरायड्रोक्लोराइडचे ५० एमजी/ ५०० एमजी प्रमाण असलेल्या मिश्रणाच्या १० गोळ्या ६५ रुपयांना, तर ५० एमजी / १००० एमजी मिश्रण असलेल्या गोळ्या ७० रुपयांमध्ये उपलब्ध असतील. इतर कंपन्यांच्या औषधांच्या तुलनेत ही औषधी ६० ते ७० टक्क्यांनी स्वस्त आहेत. मोठ्या कंपन्यांची औषध १० गोळ्या १६२ रुपयांपासून २५८ रुपयांदरम्यान बाजारात विक्री केली जात आहे.

सीटाग्लिप्टीन हे औषध पीएबीआयचे सीईओ रवी दाधिच यांनी लॉन्च केले आहे. है औषध टाईप-२ मधुमेह असलेल्या प्रोढांमध्ये शर्करा नियंत्रित करून जेवण आणि व्यायामासोबत बरेच गुणकारी असल्याचा दावा मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com