
Parbhani News : ऑगस्टमध्ये परभणी जिल्ह्यात सरासरी २२७.८० मिलिमीटर अपेक्षित असतांना यावर्षी (२०२३) प्रत्यक्षात सरासरी ७२.२ मिलिमीटर (३१.६९ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २४१.२० मिलिमीटर अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ८८.९ मिलिमीटर (३६.९० टक्के) पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात १५५.६ मिलिमीटर व हिंगोली जिल्ह्यात १५२.३ मिलिमीटर पावसाची तुट आली आहे.
यंदा या दोन जिल्ह्यात संवेदनशील अवस्थेत पावसाचा २२ ते २८ दिवस खंड पडल्यामुळे दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. गतवर्षी (२०२२) ऑगस्टमध्ये परभणीत १६८.४ मिलिमीटर व हिंगोली जिल्ह्यात ११२.४ मिलिमीटर पावसाची तुट आली होती.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलात सरासरीच्या तुलनेत अतिशय कमी पाऊस झाला. सर्वात कमी रामपुरी (ता. मानवत) मंडलात २९.६ मिलिमीटर (१३ टक्के) तर सर्वाधिक परभणी शहर मंडलामध्ये १३०.९ मिलिमीटर (५६.६ टक्के) पाऊस झाला.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात सरासरी ७ पावसाळी दिवसांची नोंद झाली तर २२ ते २८ दिवस पावसाचा खंड राहिला. जिल्ह्यात २०१२ ते २०२३ या १२ वर्षाच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.
गतवर्षीच्या (२०२२) ऑगस्टमधील ५९.५ मिलिमीटर (२६.५ टक्के) हा पावसाचा निचांक आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात सरासरी ५९२.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतांना यंदा (२०२३) या तीन महिन्यात प्रत्यक्षात ३३८.८ मिलिमीटर (५७.२ टक्के) पाऊस झाला. गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत ५०९.८ मिमी (८६.०७ टक्के) पाऊस झाला होता.
हिंगोली जिल्ह्यात २२ ते २६ दिवस खंड
यंदाच्या ऑगस्टमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सर्वात कमी सेनगाव मंडळात ४१.५ मिलिमीटर (१९.५ टक्के) तर सर्वात जास्त पानकन्हेरगाव (ता. सेनगाव) मंडलात १५२.७ मिलिमीटर (७१.७ टक्के) पाऊस झाला.
यंदा ऑगस्ट मध्ये सरासरी ८ पावसाळी दिवसांची नोंद झाली तर २३ ते २७ दिवस पावसाचा खंड राहिला. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरी ६४०.६ मिलिमीटर अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ५०८ मिलिमीटर (७९.३ टक्के) पाऊस झाला. गतवर्षी (२०२२) ऑगस्ट मध्ये १२८.८ (५३.४ टक्के) पाऊस झाला होता.
परभणी जिल्हा ऑगस्ट मधील तुलनात्मक पाऊस स्थिती (मिलिमीटरमध्ये)
वर्षे सरासरी पडलेला पाऊस टक्केवारी
२०१२ २०३.५ १०७.३ ५२.७२
२०१३ २०३.५ १४४.० ७०.७६
२०१४ २०३.५ १५१.५ ७४.४४
२०१५ २०३.५ ८७.११ ४२.८०
२०१६ २०३.५ ८३.३० ४०.९३
२०१७ २०३.५ १९३.९ ८५.१
२०१८ २२७.८ २०४.० ८९.६
२०१९ २२७.८ १३१.१ ५७.६
२०२० २२७.८ १३४.४ ५९.०
२०२१ २२७.८ १४२.५ ६२.६
२०२२ २२७.८ ५९.५ २६.१
२०२३ २२७.८ ७२.२ ३१.६९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.