गारांच्या पावसाचा दापोली, चिपळूण, संगमेश्‍वरला तडाखा

आठ गावांमध्ये नुकसानीचा आकडा बावीस लाखांपर्यंत
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

रत्नागिरी ः वेगवान वाऱ्यासह पडलेल्या गारांच्या (Hailstorm) पूर्वमोसमी पावसाने (Pre-Monsoon rain) दापोली, चिपळूण, संगमेश्‍वर या तीन तालुक्यांना तडाखा बसला. यामध्ये घरे, गोठ्यांचे २३ लाखांचे नुकसान (Damage) नोंदले गेले असून एकट्या संगमेश्‍वर तालुक्यातील आठ गावांतील १२० मालमत्तांचा समावेश आहे. या तालुक्यातील नुकसानीचा आकडा बावीस लाखांपर्यंत गेला आहे. यामध्ये वाडाविसराड गावातील एका घरावर वीज पडून नुकसान झाले. सुदैवाने ग्रामस्थांना दुखापत झाली नाही.

जिल्ह्यात रविवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी २.८९ मिलिमीटर पावसाची (Heavy Rain) नोंद झाली. त्यात संगमेश्‍वर २० मिलिमीटर, रत्नागिरी ४, लांजा २ मिलिमीटर पावसाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाकडून पावसासंदर्भात दक्षतेचा इशारा पूर्वीच दिला होता. विजांच्या कडकडाटासह वादळसदृश्य स्थिती संगमेश्‍वर, खेड, दापोली तालुक्यांत होती. संगमेश्‍वरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. वेगवान वाऱ्यामुळे झाडे उन्मळून घरे, गोठ्यांवर पडून नुकसान झाले. काहींच्या छताची कौले, पत्रे उडून गेले.

संगमेश्‍वर तालुक्यात सुमारे दोन तास वाऱ्याचे (High winds) तांडव सुरू होते. संगमेश्‍वर तालुक्यातील १२० घरे, गोठे आणि मंदिराचे नुकसान झाले. त्यात धामापूर तर्फे संगमेश्‍वरमधील २० मालमत्तांचे पावणेदोन लाखांचे, डींगणी कुरण येथील १४ घरांचे चार लाखांचे, फुणगुसमधील एका घराचे ४७ हजार रुपयांचे, नारडुवेमधील ६७ मालमत्तांचे १५ लाख रुपयांचे, असावेतील चार घरांचे ४० हजार रुपयांचे तर वाडाविसराड येथील एका घरावर वीज कोसळून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्यात आले असून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. यातील काही घरांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. तसेच पाऊस आणि वादळामुळे दापोलीत पिसईतील तीन घरांचे व पालघरमधील एका घराचे १३ हजार रुपयांचे, चिपळूण तालुक्यातील तिवरे, धेंदवाडी, धनगरवाडीतील तीन घरांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com