Grampanchyat Election : ग्रामपंचायतींचे काउंटडाउन सुरू

सोशल मीडियावर धूम; एकच आठवडा शिल्लक
 Grampanchyat Election
Grampanchyat ElectionAgrowon
Published on
Updated on

अमरावती : जिल्ह्यातील २५७ ग्रामपचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली असून कार्यसम्राट सरपंच, आपलाच भाऊ सरपंच होणार, विकासाचा महामेरू अशा बिरुदावलीचे स्टेटस मिरवीत उमेदवारांनी थेट सोशल मीडियावरूनच (Social Media) मतदारांना साद घातली आहे. विशेष म्हणजे गावागावातचौका, चौकांवर, नाक्यांवर पोस्टर वॉर सुरू झाल्याने सरपंचांची निवडणूक अगदी हायटेक झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

 Grampanchyat Election
Grampanchyat Election : व्हायचंय सरपंच तर कर खर्च!

जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला तर मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. सोशल मीडियाच्या काळात प्रचाराचा चेहरा मोहराच बदलला आहे, ही ग्रामपंचायतींची निवडणूक की विधानसभेची, असा प्रश्न मतदारांना पडत आहे. अनेक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शिवाय गावातील चौकांमध्ये बॅनर, पोस्टरबाजी सुद्धा शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे मतदारराजा सुद्धा सर्वांनाच प्रतिसाद देत असल्याने मतमोजणीनंतरच आपले कोण, याचा फैसला उमेदवार करू शकणार आहे. विशेष म्हणजे प्रचारासाठी केवळ एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांनी सोशल मीडियासोबतच प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे.

 Grampanchyat Election
Grampanchyat : मंद्रूप ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचा पुरस्कार

विकासाचे काय?

बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सरपंच तसेच सदस्य पदांसाठी बहुतांश नवे चेहरे यंदा रिंगणात आहेत. त्यामुळे साहजिकच प्रचारात सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू असतानाच दुसरीकडे महत्त्वाचा घटक असलेला गावविकास मात्र नेतेमंडळींच्या प्रचारापासून कोसोदूर आहे. गावच्या विकासाचे काय, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

ग्रामीण अर्थकारणाला बूस्टर डोस

कोरोनानंतर शहरापासून ते ग्रामीण भागातील व्यवसाय थंडावले. कोरोनानंतर दोन वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने अनेक रिकाम्या हातांना कामे मिळाली आहेत. पोस्टर, बॅनर्स तयार करणाऱ्यांपासून ते ऑटोरिक्षा, मंडपवाले, साउंड सिस्टिम, हॉटेल, ढाबे व्यावसायिकांना चांगलाच बूस्टर डोस मिळाला आहे. याशिवाय अनेकांना अप्रत्यक्ष कामे मिळाली. त्यामुळे यंदाची निवडणूक ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com