Banana Crop : कमी दर्जाच्या केळीची कवडीमोल दरात खरेदी

Banana Price : सणासुदीमुळे केळीला उठाव असल्याने दर टिकून राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon

Jalgaon News : खानदेशात दर्जेदार, निर्यातक्षम केळीचे दर १८५० रुपये प्रतिक्विंटल, असे स्थिर आहेत. कमी दर्जाच्या किंवा जुनारी (काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेली केळीबाग) बागांमधील केळीचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

Banana Market
Pik Vima : विमाधारकांच्या केळी पिकांची स्थळ पाहणी

खानदेशात केळीची आवक रखडत सुरू आहे. आगाप कांदेबाग केळीमधील काढणी मागील तीन ते चार दिवसांत काहीशी वाढली आहे. ही आवक पुढे दिवसागणिक वाढेल, असेही दिसत आहे. कमी पावसामुळे मात्र आगाप बागांमध्ये घड पक्व होण्ंयाची क्रिया यंदा मंद गतीने सुरू आहे.

अनेक शेतकरी घड पक्व करण्यासंबंधी व्यवस्थित सिंचन व इतर तंत्राचा अवलंब करीत आहेत. सध्या खानदेशात प्रतिदिन १२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. ही आवक मागील १५ ते १६ दिवसांत सुमारे १५ ते १६ ट्रकनी वाढली आहे. मध्य प्रदेशात दर्जेदार केळीचे दर २००० रुपयांवर आहेत. पण दर्जेदार केळीची आवक मध्य प्रदेशातही कमी आहे.

Banana Market
केळीला मिळतोय प्रथमच विक्रमी भाव

खानदेशात सध्या जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा तालुक्यात केळीची आवक होत आहे. मृग बागांमधील काढणी ९० ते ९५ टक्के झाली आहे.

काही बागांमधील काढणी जवळपास १०० टक्के झाली आहे. यामुळे जुनारी बागांमधील केळीची आवक कमी आहे. पण पिलबाग (खोडवा) केळीमधील आवक सुरूच आहे. पिलबाग केळी रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, शिरपूर व शहादा भागात आहे. दर्जेदार केळी पिलबागांमध्ये येत आहे.

केळीस उत्तर भारतासह राज्यातही उठाव आहे. यामुळे दरही टिकून आहेत. उत्तर भारतात पंजाब, दिल्ली व काश्मिरातील श्रीनगर येथे केळीची मागणी वाढली आहे. केळीची सर्वाधिक आवक सध्या यावल व रावेर तालुक्यातच अधिक आहे.

या भागात रोज ८० ते ९० ट्रक केळीची आवक होत आहे. जळगाव, चोपडा भागातील आवक कमी आहे. पुढे जुनारी बागा व पिलबागांमधील केळीची आवक घटेल व कांदेबाग केळीमधील आवक वाढेल, असेही चित्र आहे. सणासुदीमुळे केळीला उठाव असल्याने दर टिकून राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com