BJP Nagar News : नगर जिल्ह्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांत खदखद

BJP : भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खदखद आहे. स्वपक्षातील नेत्यांविरुद्धच ही नाराजी आहे. प्रत्येक वेळी निष्ठावंतांना डावलले जाते आहे. कोणताच निर्णय घेताना विचारात घेतले जात नाही, असा या कार्यकर्त्यांचा सूर आहे.
 BJP Nagar
BJP NagarAgrowon

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
BJP Nagar : नगर ः भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खदखद आहे. स्वपक्षातील नेत्यांविरुद्धच ही नाराजी आहे. प्रत्येक वेळी निष्ठावंतांना डावलले जाते आहे. कोणताच निर्णय घेताना विचारात घेतले जात नाही, असा या कार्यकर्त्यांचा सूर आहे.

ही बाब राज्याच्या पक्षनेतृत्वाच्या कानावर घालण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हे नाराज नेते, कार्यकर्ते भेटणार आहेत.

या नाराजीची दखल न घेतल्यास आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो, असेही या वेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

नगर जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार व एक खासदार आहेत. पालकमंत्रीही पक्षाचे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत नाराजी सातत्याने चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व निष्ठावान कार्यकर्ते प्रा. भानुदास बेरड, अल्लाउद्दीन काझी यांच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी नगर येथील सरकारी विश्रामगृहात नगर जिल्ह्यातील भाजपचे निष्ठावान व जुने कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत पक्षांतील नेत्याबाबत उपस्थित कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 BJP Nagar
BJP Nagar News : नगरला भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड हालचालींना वेग

स्वपक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत आहेत. या नाराजीची दखल न घेतल्यास आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो, असा या कार्यकर्त्यांचा सूर होता.

विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर भाजपमध्ये खळबळ उडाली. पक्ष विस्तारात असताना अनेकांनी प्रवेश केला. परंतु जुने नेते व कार्यकर्त्यांना डावलले गेले.

पक्षाकडे एक व्होट बँक आहे. निष्ठावंतांना विचारात घेतले जात नसल्याने त्या व्होट बँकेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कार्यक्रमात, बैठकीत सन्मानाची वागणूक मिळत नाही.

निष्ठावंतांनाच डावलले तर संघटन टिकणार कसे, असे त्यांचे म्हणणे आहे. डावलण्याची प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर प्रचारालाच बाहेर पडायचे नाही, असे काहींचे म्हणणे होते. पक्ष नेतृत्व याबाबत काय भूमिका घेते आहे, याकडे लक्ष लागले आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने पक्षाच्या व्होट बँकेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर नगरमधील स्थिती घालणार
आहोत.                                      - प्रा. भानुदास बेरड, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com