
Bhogavati Cooperative Sugar Factory Kolhapur : भोगावती सहकारी साखर कारखान्याची साखर परस्पर विकली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत केला होता. यावरून आता भोगावतीच्या संचालकांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगत अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भोगावती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्य उदयसिंह पाटील कौलवकर म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर भोगावती साखर कारखान्याची बदनामी करुन काहीजण द्वेषाचे राजकारण करत आहेत.
भोगावतीमधील साखर विक्री रितसर आणि नियमानुसार होत आहे. परंतु, जे बदनामी करत आहेत त्याच्यांवर कायदेशीर सल्ला घेऊन कारखान्याच्यावतीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे कौलवकर म्हणाले.
जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेमध्ये भोगावतीबाबत प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. केवळ कारखान्याचे अध्यक्ष असलेले पी. एन. पाटील हे बँकेचे संचालक असल्याने तिथे प्रश्न विचारण्यात आला. पी. एन. पाटील यांची मानहानी करण्याचा एकप्रकारे हा डावच होता.
आम्ही साखरविक्रीचा भरणा पारदर्शकपणे केला आहे. निदान याची माहिती घेण्याची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवुन चुकीची आणि कारखान्याच्या बदनामीचे प्रयत्न करु नयेत. निवडणुकीच्या मैदानात आरोप करा, त्याची आम्ही उत्तरे देऊ.
हुकुमशाही पध्दतीने कारखान्यात घुसून खोटी माहिती घेणे शोभत नाही. वारंवार होणाऱ्या चुकीच्या आणि बदनामीकारक आरोपामुळे भोगावतीच्या सर्व कारभारावर व्यापक परिणाम होऊ शकतो याचे तरी निदान भान ठेवा. असेही पाटील म्हणाले.
तसेच कारभाराबद्दल काही शंका असल्यास आम्हाला भेटून निदान चर्चा करा, तुम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ. मात्र, आता पाणी डोक्यावरून गेले आहे, कोणत्याही परिस्थितीत अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असे ते म्हणाले. यावेळी संचालक हिंदुराव चौगले, धीरज डोंगळे, ए. डी. पाटील, मारुतराव जाधव, संजयसिंह पाटील, ए. डी. चौगले, रवी पाटील आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.