Irrigation Backlog : ‘सिंचन अनुशेष निवारणासाठी कृती कार्यक्रम घोषित करा’

Marathwada Irrigation : सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दुष्काळ सहन करण्याची क्षमता मराठवाड्यात राहिलेली नाही, असे शिवपुरे यांनी स्पष्ट केले.
Mhaisal Irrigation scheme
Mhaisal Irrigation schemeAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ‘‘मराठवाडा सिंचन अनुशेष निवारणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करा, अन्यथा मराठवाडा पाणी परिषदेतर्फे जल आंदोलन उभारण्यात येईल,’’ असा इशारा मराठवाडा पाणी परिषदेतर्फे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी दिला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर १० सप्टेंबर रोजी ‘मराठवाडा सिंचन अनुशेष व भावी दिशा’ या विषयावर कार्यशाळा झाली. आज (ता. १६) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा सिंचन अनुशेष निवारणाचा कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करावा, ही आग्रहाची मागणी आहे.

सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दुष्काळ सहन करण्याची क्षमता मराठवाड्यात राहिलेली नाही, असे शिवपुरे यांनी स्पष्ट केले.

Mhaisal Irrigation scheme
Mhiasal Irrigation Scheme : जतसाठीचे म्हैसाळचे पाणी मुरले कुठे?

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना पाठविलेल्या निवेदनावर जलतज्ज्ञ डॉ. शंकरराव नागरे, दुसऱ्या सिंचन आयोगाचे सदस्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, श्री. शिवपुरे, सेवानिवृत्त अभियंता जयसिंग हिरे, गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे, प्रा. डॉ. गणेश बडे, परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर सरोदे, ेडॉ. योगिता तौर- होके पाटील, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, शेतकरी, पाणी वापर संस्था, सरपंच आदींच्या सह्या आहेत.

...अशा आहेत मागण्या

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातील तरतूद व उच्च न्यायालय आदेश २३ / ०९ / २०१६ (पीआयएल १७३-२०१४) नुसार मराठवाड्यात त्वरित समन्यायी पाणीवाटप नियमानुसार संबंधित विभागास १५ ऑक्टोबरपासून ऊर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश द्या.

शासन निर्णय २३ ऑगस्ट २०१९ नुसार कोकणातील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाया जाणारे ३७० टीएमसी पैकी १६८ टीएमसी पाणी मराठवाड्यात वळविण्याच्या योजनेच्या कामाला गती द्या.

Mhaisal Irrigation scheme
Drip Irrigation Subsidy : ठिबक सिंचनासाठी दीड कोटीचे अनुदान प्राप्त

कृष्णा मराठवाडा व विदर्भातील वैनगंगा - प्राणहिता खोऱ्यातील अतिरिक्त पाणी वैनगंगा नळगंगा उपसा सिंचन योजनेद्वारे येलदरी धरणात वळवा

मराठवाड्यातील ४८ पैकी १६ धरणांचे कामच सुरू झालेले नाही. उर्वरित ३२ धरणांचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. बांधकाम कालावधी निश्‍चित करून वेळेत धरणे पूर्ण करा

सिंचन अनुशेषासाठी अमरावती विभागाप्रमाणेेे विशेष अनुदान, पाणलोट प्रकल्प, वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार अभियान, कालवे व चाऱ्या दुरुस्तीसाठी विशेष निधी द्यावा.

नागपूर करारानुसार मराठवाड्याचा समतोल व सर्वांगीण विकास साधण्यासाठी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ कार्यन्वित करा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com