
Nashik News : येथे ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने द्राक्ष शेतीमधील विविध तंत्रज्ञानांवर आधारित ‘ॲग्रोवन द्राक्ष प्रदर्शन २०२३’ चे ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ठक्कर्स डोम येथे होणार असून, यात देश-विदेशांतील विविध कंपन्यांच्या तंत्रज्ञानांचे सादरीकरण होणार आहे.
प्रदर्शनातील चर्चासत्रात भारतासह परदेशातील नामांकित शास्त्रज्ञ, संशोधक, प्रगतिशील शेतकरी हे मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनासाठी आपले तंत्रज्ञान आणि उत्पादने थेट द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी विविध उद्योगांना मिळणार आहे.
हे प्रदर्शन नाशिकसह पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांतील द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. शेतकऱ्यांना विविध देशांतील द्राक्षशेतीचे तंत्रज्ञान, संशोधन, विपणन, प्रक्रिया, निर्यात आदी विविध क्षेत्रांतील माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
अधिक माहितासाठी संपर्क
नाशिक : चेतन - ९१६८६६११५८, पुणे : शीतल - ९९७५७६५८३८, सांगली : शीतल - ९८८११२९२९३, जळगाव : भूषण - ९९६०४१११९६, सोलापूर : प्रदीप - ७५०७७७५०३७.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.