Agricultural Department : माहिती देण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ

माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सिंदखेडराजा कृषी विभागातील संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नशिराबाद येथील गणेश बाबू राठोड यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Agricultural Department
Agricultural DepartmentAgrowon

बुलडाणा ः माहिती अधिकारांतर्गत (Information Technology) मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सिंदखेडराजा कृषी विभागातील (Sindkhedraja Agricultural Department) संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नशिराबाद येथील गणेश बाबू राठोड (Ganeshbabu Rathod) यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Agricultural Department
देशात pre-packaged, labeled agri products वर जीएसटी लागू|Food GST|Agrowon | ॲग्रोवन

राठोड यांनी तालुका कृषी विभागात अर्ज देत १ जानेवारी २०२० ते आतापर्यंत खामगाव, खापरखुटी, शिवणी टाका येथील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, शेडनेट, कांदाचाळ, ग्रीनहाऊस, पॉलिहाउस, पॅकहाउस, शेततळे, प्लॅस्टिक अस्तरीकरण आदी कामांसाठी दिलेल्या अनुदानाची माहिती मागितली आहे.

Agricultural Department
Agri Business : कृषी पदवीधरांसाठी कृषी आधारित उद्योग प्रशिक्षण

याबाबत ४ जुलै २०२२ ला अर्ज केला आहे. यावर १८ ऑगस्टला प्रथम अपील सादर केले. त्याची सुनावणी २ सप्टेंबरला ठेवण्यात आली. या वेळी उपस्थित राहूनही सुनावणी घेतली नाही. त्यानंतर २७ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली.

तेव्हा मागितलेली माहिती २९ सप्टेंबरला देण्याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार या दिवशी माहिती मागण्यास गेलो असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ही माहिती कार्यालयात नाही ऑनलाइन आहे.

ती देण्यास वेळ लागेल असे उत्तर मिळाले.

या अनुदान वाटपात मोठा घोळ झालेला असून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. तरी मागितलेली माहिती नमुन्यात द्यावी, अशी मागणी गणेश राठोड यांनी ३० सप्टेंबरला दिलेल्या निवेदनात केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com