Kharif Agriculture Work : पावसाच्या उघडिपीने राज्यात शेतीकामांना चांगलाच वेग

Interculture work : सध्या राज्यातील सर्वच भागांत पावसाचा जोर कमी झाल्याने शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Agriculture Work
Agriculture WorkAgrowon

Pune News : सध्या राज्यातील सर्वच भागांत पावसाचा जोर कमी झाल्याने शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्गमधील अंबोली येथे रविवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत ९३.५ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला.

कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील धसई, नयाहडी, उल्हासनगर, अंबरनाथ, गोरेगाव, रायगडमधील आटोने, करंजवडी, नाटे, माणगाव, निजामपूर, रोहा, नागोठणे, वाकण, श्रीवर्धन, वालवटी, मेंढा या ठिकाणी तुरळक सरी बरसल्या. रत्नागिरीमधील मालगुंड २१.५, पाली २१, माखजन २२.३, देवरुख २१.३, तुळसानी येथे २१.३ मिलिमीटर पाऊस झाला.

Agriculture Work
Kharif Season : वाशीम जिल्ह्यात पीकस्थिती समाधानकारक

चिपळूण, खेर्डी, कळकवणे, शिरगाव, बुरोंडी, भरणे, धामणंद, आबलोली, म्हाप्रळ, देव्हारे, खेडशी, फसोप, कोतवडे, टेरव, कडवी, मुरडव, फणसवणे, देवळे, माभळ, तेर्ये, लांजा, भांबेड, पुनस, विलवडे सिंधुदुर्गमधील पडेल, मीठबाव पाटगाव, बापर्डे, पेंडूर, मसूरे, आचरा, सावंतवाडी, बांदा, मडुरा म्हापण, नांदगाव, माणगाव, पिंगुळी, वैभववाडी, येडगाव, भुईबावडा, तळकट, पालघरमधील मोखडा, खोडला, तलसरी, झरी येथे हलक्या सरी बरसल्या.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापुरातील कडगाव मंडलात सर्वाधिक ७५.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर कळे, करंजफेन, मलकापूर, राधानगरी, सरवडे, कसबा, गगनबावडा, साळवण, सांगरूळ, कराडवाडी, आजरा, मडिलगे, नारंगवाडी, तुर्केवाडी, नाशिकमधील उंबरठाणा, सुरगाणा, पुण्यातील आंबवडे, निगुडघर, पानशेत, विंझरमध्ये तुरळक सरी पडल्या. साताऱ्यातील तापोळा २२.८, लामज २८.८ मिलिमीटर पाऊस झाला.

Agriculture Work
Kharif Season 2023 : शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

मराठवाड्यातील जवळपास सर्वच भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. तरी छत्रपती संभाजीनगरमधील जरांदी, बीडमधील नळवंडी, लातूरमधील लामजना, निलंगा, आंबुलगा, हलगरा, नांदेडमधील मांदवा मंडळात शिडकावा झाला.

पूर्व विदर्भातील गडचिरोलीतील भामरागड येथे ३७.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर ब्राह्मणी, आलापल्ली, पेरमिली, धानोरा, चाटेगाव, गोंदियातील खामरी, काट्टीपूर, तिरोडा, बोधगाव देवी येथे हलका पाऊस पडला.

पश्‍चिम विदर्भातील बुलडाण्यातील चिखली, अमडापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, घोडप, बुलडाणा, वरवंड, कल्याना, धामनगाव, वाशीममधील वाकद, मेडशी, अमरावतीतील हरीसळ, सेमडोह, वाडळी, यवतमाळमधील हिवरी, शिबला आणि वर्धा येथे हलक्या सरी पडल्या.

राज्यात रविवारी (ता.६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटर)

कोकण : पोलादपूर २३.३, कोंडवी ४०.५, आंबवली ३५.३, कुळवंडी २८.५, मंडणगड २७.३, आंगवली २५.३, कोंडगाव २५, शिरगाव २४, श्रावण २९.३, पोइप २९.३, कणकवली ३३.३, वागदे ३३.३, कडावल २७.८, कसाल २८, डहाणू ३६.८, जव्हार २५.८, साखर २१.५, भेडशी २६.

मध्य महाराष्ट्र : ननाशी ४०.३, धारगाव २१.८, पेठ २७.३, जागमोडी २३.३, भोलावडे ४६.३, वेल्हा ४७.८, परळी २२.५, बामणोली २६.८, हेळवाक ४६, महाबळेश्‍वर ३३.८, चंदगड ३८.३, बाजार २६.८, गवसे २९, हेरे, आंबा २५,

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com