Khandesh Rain : खानदेशात मोठ्या खंडानंतर पावसाची हजेरी

Latest Rain Update : खानदेशात मोठ्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे ज्वारी, मका, कापूस आदी पिकांना जीवदान मिळणार आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Jalgaon News : खानदेशात मोठ्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे ज्वारी, मका, कापूस आदी पिकांना जीवदान मिळणार आहे. नंदुरबार शहर व लगत काही मिनिटांतच ४० मिलिमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याची माहिती आहे.

खानदेशात अपवाद वगळता सर्वत्र मध्यम, हलका व काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळनंतर सर्वत्र पाऊस झाला.

सुरुवातीला सुसाट वारा सुटला. यानंतर तुरळक पाऊस झाला. काही वेळात मध्यम ते हलका पाऊस सायंकाळी अनेक भागात झाला. रात्रीदेखील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.

मागील सात ते आठ दिवस प्रचंड उकाडा व उष्णता अशी स्थिती होती. पिके माना टाकत होते. मुरमाड, हलक्या जमिनीत पिके वाया गेली होती. चाळीसगाव, पारोळा, भडगाव, अमळनेर, जळगाव, बोदवड, धरणगाव, जामनेर, धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, शहादा तालुक्यांतील पूर्व भागात पीकस्थिती बिकट बनली होती.

Rain Update
Artificial Rain : या देशांनी कृत्रिम पावसाचा प्रयोग केलाय...

काळ्या कसदार जमिनीत पिके तग धरून होते. मका, ज्वारी निसवणीच्या अवस्थेत अनेक भागांत असतानाच पावसाचा खंड तयार झाला. काही भागांत २७ ते २८ दिवसांनंतर, तर काही भागांत ३२ दिवसांनंतर पाऊस आला आहे.

पाऊस नसल्याने कृत्रीम जलसाठाधारक शेतकऱ्यांनी केळी, कापूस, ऊस आदी पिकांचे सिंचन सुरू केले होते. कारण पूर्वहंगामी कापूस पीक फुले, पाते लगडण्यासह कैरी किंवा बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत होते. त्यास पाण्याची आवश्यकता होती. मृग बहर केळी बागांची देखील (जून, जुलैमध्ये लागवडीच्या बागा) उष्णतेमुळे व पावसाअभावी वाढ खुंटली होती. यामुळे शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या मदतीने पिकांत सिंचन सुरू केले.

Rain Update
Rain Prediction : राज्यातील पावसात ऑगस्टअखेर ११ टक्क्यांची तूट

कोरडवाहू क्षेत्रातील उडीद, सोयाबीन, मका, ज्वारी, कापूस, बाजरी, तूर आदी पिकांची स्थिती सर्वत्र नाजूक बनली होती. उडदात फुलांची गळ सुरू होती. तसेच सोयाबीनदेखील हातचा जाईल की काय, अशी स्थिती होती. अशातच पाऊस आल्याने या पिकांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी नंदुरबार शहर व लगत जोरदार पाऊस झाला. २० ते २५ मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

तसेच शहादा, नवापूर, तळोदा भागांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. धुळ्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातही धरणगाव, जामनेर, जळगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. रात्री पाऊस काहीसा बंद होता. परंतु मध्यरात्रीनंतर पुन्हा सरी कोसळू लागल्या. जळगाव, धुळे व नंदुरबारात कुठेही अतिपाऊस किंवा अतिवृष्टी बुधवारी झालेली नसल्याची माहिती मिळाली.

पावसाची स्थिती (मिलिमीटरमध्ये) ः

नंदुरबार जिल्हा ः नंदुरबार ४५, शहादा १९, तळोदा २३. धुळे जिल्हा ः धुळे १५, शिंदखेडा ११, साक्री २३. जळगाव जिल्हा ः जळगाव २२, एरंडोल २१, धरणगाव १८.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com