Voter Registration : ‘सतरा वर्षांच्या युवकांना करता येणार आगाऊ मतदार नोंदणी’

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदविण्याची तरतूद होती. मात्र आता १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
Voter Regestration
Voter RegestrationAgrowon

नगर : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदविण्याची (Voter Registration) तरतूद होती. मात्र आता १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. मात्र वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे नाव मतदार यादीत येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा या वर्षापासून उपलब्ध केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

Voter Regestration
APMC Election: मतदार यादीत नाव नसले तरी निवडणूक लढू शकतात शेतकरी ?

छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी भोसले यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.

भोसले म्हणाले, ‘‘मतदारांना नावनोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी करता येईल. मात्र अर्ज भरून दिल्यानंतर जर पत्ता बदलला असेल, तर त्याची माहिती कळवावी लागेल. अर्जदाराच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान कर्मचारी त्याच्या नावनोंदणीचा अर्ज नमुना-६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जमा करतील.

Voter Regestration
APMC Election : बाजार समितीत शेतकऱ्यांना उमेदवारी

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी अर्ज नमुना-८ भरून द्यावा, मृत, दुबार व स्थलांतरितांची नावे मतदार यादीतून वगळली जातील. त्यासाठी अर्जनमुना-७ भरून द्यायचा आहे. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांतून जनजागृती केली जात आहे. याशिवाय १९, २० नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबरला विशेष पडताळणी केली जाईल.

निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ पर्यंत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत राबविला जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. हरकती व दावे ८ डिसेंबरपर्यंत स्वीकारले जातील. २६ डिसेंबरला ते निकाली काढले जातील. अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com