
Jalgaon News : जिल्ह्यात आतापर्यंत ८९ टक्के पाउस झाला आहे. असे असले, तरी ९१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वांधिक १०८ टक्के पेरा हा कापसाचा झाला आहे. जून महिना कोरडा गेला असताना अवघ्या एका जूलै महिन्यात ९१ टक्के पेरण्या झाल्या. पावसानेही जून महिन्याचा बॅकलाग भरून काढला असला, तरी पिकांच्या वाढीसाठी आणखी दमदार पावसाची गरज असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाचा कडाका होता. त्याचबरोबर मॉन्सूनवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. तब्बल महिनाभर उशिराने पावसाने हजेरी लावली. असे असले तरी सव्वा महिन्यात पावसाने एका महिन्यातील पावसाचा अनूशेष भरून काढला. आतापर्यंत ८९.४ टक्के पाऊस झाला आहे. पिकांच्या वाढीसाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे. सोबतच सूर्यप्रकाशाचाही गरज आहे.
कापसाचा पेरा सर्वाधिक
२०२१ मध्ये कापूस टंचाईने कापसाला दहा ते तेरा हजारांचा भाव मिळाला होता. यामुळे २०२२ मध्ये तोच भाव मिळेल या आशेने कापसाचा पेरा अधिक झाला होता. मात्र भाव ९ हजारांच्या वर गेला नाही. असे असले तरी यंदा (२०२३) कापसाचा पेरा आतापर्यंत १०८ टक्के झाला आहे. कापसाचे अपेक्षीत क्षेत्र ५ लाख १ हजार ५६८ असताना यंदा ५ लाख ४१ हजार ५६५ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे.
तालुकानिहाय पेरण्या
तालुका टक्केवारी
जळगाव ९२
भुसावळ ७७
बोदवड १००
यावल ९२
रावेर ८७
मुक्ताईनगर ९१
अमळनेर ८५
चोपडा ८५
एरंडोल ९१
धरणगाव ८४
पारोळा ९३
चाळीसगाव ९२
जामनेर ९७
पाचोरा ९९
भडगाव ८६
एकूण सरासरी ९१ टक्के
मोठ्या धरणात चांगला जलसाठा (टक्के)
धरणाचे नाव जलसाठा गतवर्षीचा साठा
हतनूर ३१.२९ १८.७५
गिरणा ३४.०२ ९०.४६
वाघूर ५६.७५ ६८.९५
अभोरा १०० १००
मंगरूळ १०० १००
सुकी १०० १००
मोर ६२.४७ ६६.७८
अग्नावती ०.०० ८.५१
हिवरा ०.७३ ७.५९
बहूळा १०.८६ ४५.०१
तोंडापूर ४३.०२ १००
अंजनी ४३.१८ ३८.५३
गूळ ५०.५३ ६५.२७
भोकरबारी ०.०० १२.१६
बोरी १०.८० ४०.४८
मन्याड ५.७१ २९.५५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.