Jowar Market : सासवडच्या बाजारात ज्वारीला उच्चांकी ५१५१ रुपये दर

Jowar Rate : पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे.
Jowar
Jowar Agrowon

Pune News : पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्याची आवक, जावक होते. बुधवारी (ता. २८) ज्वारीला प्रति क्विंटलला सर्वाधिक ५१५१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांनी दिली.

Jowar
Jowar Crop: ज्वारीतून मिळालं एकरी ५२ हजार रुपये उत्पन्न

तालुक्यात नीरा आणि सासवड अशा दोन बाजार समित्या आहेत. यामध्ये नीरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुख्य बाजार समिती आहे. त्याअंतर्गत सासवड येथे उपबाजार समिती आहे. नीरा ही बाजार समिती गुळासाठी प्रसिद्ध आहे. तर सासवड येथील उपबाजार समिती ही धान्यासाठी प्रसिद्ध आहे.

येथे दिवे, सोनोरी, शिवरी यासह संपूर्ण पुरंदर, बारामती आणि फलटण भाग अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. त्यामुळे येथील धान्यबाजार हा चांगलाच प्रसिद्ध असल्याने येथून पुण्यासह विविध भागात धान्य विक्रीसाठी जाते. परंतु आता खरीप हंगाम सुरू झाल्याने येथील बाजार आवक काही प्रमाणात कमीअधिक होत आहे.

Jowar
Kharif Jowar : खरीपात कोणत्या ज्वारीची करावी पेरणी, एक्सपर्ट काय सांगतात?

त्यामुळे बाजारात चढउतार होतात. बुधवारीही बाजारात काही प्रमाणात ज्वारीची आवक कमी असल्याने दरात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे समितीतील वाघेश्वरी माता टेंड्रिग कंपनीच्या ठिकाणी एक नंबर प्रतीच्या ज्वारीला ५१५१ रुपये प्रति क्विटंल, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला ३ हजार ८५५ रुपये, तर तीन नंबर प्रतीच्या ज्वारीला २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

सासवड येथील उपबाजारात धान्याची झालेली आवक व दर (प्रति क्विंटल) :

पीक -- आवक -- जावक -- प्रत एक -- प्रत दोन -- प्रत तीन

ज्वारी -- ३१ -- ३० -- ५१५१ -- ३८५५ -- २७००

बाजरी -- ९२ -- ९० -- ३१०० -- २९५० -- २८००

गहू -- ७० -- ६५ -- ३१२५ -- २८६२ -- २६००

हरभरा -- ५ -- ५ -- ४५०० -- ४२५० -- ४०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com